पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे आत्मघाती ब्लास्ट, सात ठार तर १८ जण जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात एक शांतता रॅली सुरु असताना झालेल्या आत्मघाती ब्लास्टमध्ये सात जणांचा मृ्त्यू तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे आत्मघाती ब्लास्ट, सात ठार तर १८ जण जखमी
blast in Pakistan's Khyber Pakhtunkhwa
| Updated on: Aug 02, 2026 | 10:07 PM

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांना टार्गेट करीत झालेल्या आत्मघाती ब्लास्टमध्ये तास जणांचा मृ्त्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोट झाला तेव्हा स्वात जिल्ह्यातील एका शहरात शांतता रॅली सुरु होती. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला आत्मघाती हल्ल्यासारखा होता, मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

एका हल्लेखोरांची तपासणी सुरु असताना त्याने त्याच्या अंगावरील स्फोटकांचा स्फोट केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. या घटनास्थळावरुन पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे.

पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याबाहेर हा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून त्यात नऊ जण ठार झाले आहेत. स्वात जिल्हा पोलीस अधिकारी उमर खान यांनी डॉन न्यूजला सांगितले की, जेव्हा पोलीस अधिकारी संशयिताला पोलीस ठाण्याच्या गेटवर थांबवून त्याची झडती घेण्याचा प्रयत्न करीत होते त्यावेळी त्याने हा स्फोट घडवल्याचे म्हटले जात आहे.

स्फोटाचा तपास सुरू

सुरक्षा दलांनी स्फोटानंतर हा परिसर तात्काळ सील करून पुढील तपास सुरू केला. स्वात खोऱ्यातील वाढत्या दहशतवादाच्या विरोधात जवळच्या काबल चौकात शेकडो लोक शांतता रॅली काढून निदर्शने करत असताना पोलीस ठाण्याजवळ हा स्फोट झाला आहे.

स्फोटामुळे घबराट पसरली

या स्फोटात १८ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सैदू शरीफ शिक्षण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे आंदोलकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार शांतता रॅलीचे आयोजन लोकल ट्रायबल काऊन्सिल स्वात अमन जिरगा यांनी आयोजित केले होते. त्यात सामील लोक घोषणा बाजी करत होते. आणि या भागात शांततेची मागणी करीत फलक झळकावत होते.गेल्या काही दिवसात येथे शांतता नष्ट झाल्याने नागरिकांना हा मोर्चा काढला होता.

कबाल पोलिस स्टेशनजवळ धमाका

मीडिया रिपोर्टनुसार स्वातमध्ये कबाल पोलिस स्टेशनच्या एंट्रेंसवर जेव्हा पोलिसांनी एका व्यक्तीला तपासण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुसाईड बॉम्बरने स्वत:ला उडवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कबाल पोलिस ठाण्याच्या गेटजवळ हा ब्लास्ट झाला. स्वात खोऱ्यात अलिकडे झालेल्या अतिरेकी कारवायांच्या विरोधात कबाल चौकात लोकांनी शांतता मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यातच हा ब्लास्ट झाल्याने पळापळ झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us