छोट्याशा देशामुळे अमेरिका युद्ध हारणार? एका निर्णयाने ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; इराणचा फायदाच फायदा!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यातही चालूच आहे. या युद्धाला 28 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. अमेरिका-इस्रायलने इराणवर याच दिवशी हवाई हल्ले केले होते. त्यानंतर युद्धाचा भडका उडाला.

छोट्याशा देशामुळे अमेरिका युद्ध हारणार? एका निर्णयाने ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली; इराणचा फायदाच फायदा!
donald trump and mojtaba ali khamenei
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 3:40 PM

Iran Israel War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. उलट या युद्धाचा भडका जास्तच उडाला आहे. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. हीच सामुद्रधुनीमधील दळणवळण पुन्हा सुरू व्हावे यासाठी अमेरिकेने सर्व देशांंनी आपापले नौदल सामुद्रधुनीत पाठवण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाच आता अमेरिकेला मोठा दणका बसला आहे. स्वित्झर्लंड या देशाने अमेरिकेला आपले हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली आहे. स्वित्झर्लंडचा हा निर्णय अमेरिकेसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

नेमका काय निर्णय घेतला?

मिळालेल्या माहितीनुसार इराण इस्रायल युद्ध चालू असतानाच स्वित्झर्लंडने अमेरिकेला युद्धासाठी आपले हवाई क्षेत्र वापरू देण्यास मनाई केली आहे. म्हणजेच इराणवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या अमेरिकेच्या विमानांना स्वित्झर्लंड देशाच्या हवाई सिमेतून जाता येणार नाही. 14 मार्च 2026 रोजी स्वित्झर्लंड सरकारने तशी भूमिका जाहीर केली आहे. या निवेदनानुसार अमेरिकेच्या अशाच दोन विमानांना स्वित्झर्लंडने परवानगी नाकारली.

कोणत्या विमानांना असेल परवानगी

अमेरिकेच्या इतर तीन विमानांना मात्र आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास स्वित्झर्लंड सरकारने परवानी दिलेली आहे. 15 मार्च रोजी दोन ट्रान्सपोर्ट विमाने तर 17 मार्च रोजी एक मेन्टेनन्सशी संंबंधित काम करण्यासाठी आणखी एका विमानाला जाण्यास परवानगी देण्यात आली होती. जी विमाने मानवी मदत आणि वैद्यकीय मदतीशी संबंधित असतील, त्याच विमानांना आम्ही आमच्या हवाई हद्दीतून जाण्यास परवानगी देऊ, अशी थेट भूमिका स्वित्झर्लंड सरकारने घेतलेली आहे.

युद्धात 2000 जणांचा मृत्यू

दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यातही चालूच आहे. या युद्धाला 28 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली होती. अमेरिका-इस्रायलने इराणवर याच दिवशी हवाई हल्ले केले होते. त्यानंतर युद्धाचा भडका उडाला. मिळालेल्या माहितीनुसार या युद्धामध्ये आतापर्यंत 2000 लोकांचा मृत्यू झाला. यात बहुसंख्य इराणी नागरिक आहेत. या युद्धामुळे जगावर उर्जा संकट निर्माण झाले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सगळी वाहतूक बंद आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us