आफ्रिकेत नायजर सैन्यावर दहशतवादी हल्ला, 15 सैनिकांचा मृत्यू, अनेक जवान बेपत्ता

| Updated on: Aug 03, 2021 | 6:49 AM

पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशाच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झालाय. यात जवळपास 15 सैनिकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण बेपत्ता झालेत.

आफ्रिकेत नायजर सैन्यावर दहशतवादी हल्ला, 15 सैनिकांचा मृत्यू, अनेक जवान बेपत्ता
Follow us on

नायमे (Niamey) : पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशाच्या सैन्यावर दहशतवादी हल्ला झालाय. यात जवळपास 15 सैनिकांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण बेपत्ता झालेत. हा हल्ला सैन्याच्या सप्लाय मिशनवर झाला. या हल्ल्यात 7 पेक्षा अधिक जवान जखमी झालेत. नायजरच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी (2 जुलै) या हल्ल्यानंतर 6 जवान गायब असल्याची माहिती दिलीय. हा हल्ला तिलाबेरी क्षेत्रातील तोरोदी भागात झाला. (Terrorist Attack on West African country Niger Military supply mission)

सशस्त्र दहशतवाद्यांनी दबा धरुन सैन्यावर हल्ला केला. त्यांनी त्यांचा जखमी साथीदाराला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चकमकीत तो IED वर पडून स्फोट झाला. या हल्ल्यात 15 जवानांचा मृत्यू झालाय, तर 7 जण जखमी झालेत.

दहशतवाद्यांविरोधात परिसरात शोध मोहिम

नायजरच्या सैन्याने या हल्ल्यानंतर हाय अलर्ट जारी करत संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केलीय. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी विमानातूनही सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेय. आफ्रिकेच्या या भागात जिहादी संघटना ISIS (इस्लामिक स्टेट) आणि अल कायदाचा प्रभाव आहे. हे हल्लेखोर माली आणि बुरकीना फासोच्या सीमावर्ती भागातही हल्ले करत राहतात.

नायजरमध्ये दहशतवाद्यांची भीती

नायजरमध्ये कट्टरतावादी संघटनांची चांगलीच दहशत आहे. येथे कायमच सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहतात. मागील मार्च महिन्यात दहशतवाद्यांनी थेट राष्ट्रपती भवनाबाहेरच 30 मिनिटांपर्यंत गोळीबार केला. विशेष म्हणजे मोहम्मद बाजूम राष्ट्रपती पदाची शपथ घेणार होते त्याच्या दोन दिवस आधीच ही घटना घडली.

या आधी एक आठवडाभर दहशतवाद्यांनी सर्वसामान्य लोकांवर बेछूट गोळीबार केला होता. मोटारसायकलवर आलेल्या दहशतवाद्यांनी गावात घुसून लोकांना घराबाहेर काढलं आणि गोळ्या झाडत हत्या केल्या. या हल्ल्यात 137 लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारीत अशाच हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार, माजी SPO सह पत्नी आणि मुलीची हत्या

फ्रान्समध्ये पुन्हा हादरले; दहशतवाद्यांची पोलिस ठाण्यात घुसखोरी, महिला अधिकाऱ्याचा गळा चिरला

श्रीनगरच्या नौगाममध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद

व्हिडीओ पाहा :

Terrorist Attack on West African country Niger Military supply mission