Texas School Shooting : अमेरिकेत शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 ठार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, “कारवाई करण्याची वेळ आली आहे”

हल्लेखोराबाबत मोठा खुलासा झाला आहे. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोराने शाळेत जाण्यापूर्वी आजीलाही गोळ्या घातल्या होत्या. गोळी लागल्याने आजीला सॅन अँटोनियो येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Texas School Shooting : अमेरिकेत शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 ठार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, कारवाई करण्याची वेळ आली आहे
मेरिकेत शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 23 ठार
Image Credit source: twitter
| Updated on: May 25, 2022 | 10:19 AM

नवी दिल्ली – अमेरिकेतील टेक्सासमधील (Texas) एका शाळेत सामूहिक गोळीबाराचे (Shooting) प्रकरण घडले आहे. तिथे एका 18 वर्षीय तरूण हल्लेखोराने शाळेत गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 19 विद्यार्थी, 2 शिक्षक, हल्लेखोर आणि त्याच्या आजीचा देखील मृतांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे तरूण हल्लेखोराने त्याच्या आजीचा सु्ध्दा जीव घेतला आहे. या प्रकरणाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यावेळी एक राष्ट्र म्हणून आपल्याला विचारावे लागेल की, देवाच्या नावाने बंदूक चालवणाऱ्या लॉबीच्या विरोधात आपण कधी उभे राहणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. टेक्सासमधील उवाल्डे शहरात हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे आहे. एका 18 वर्षीय हल्लेखोराने रॉब एलिमेंटरी शाळेमध्ये गोळीबार केला. या हल्ल्यात 18 विद्यार्थ्यांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर तीन शिक्षकांनाही जीव गमवावा लागला. हल्लेखोरही स्वत: ठार झाला असून तो त्याच हायस्कूलचा विद्यार्थी होता.

हल्लेखोराने आधी आजीला लक्ष्य केले

हल्लेखोराबाबत मोठा खुलासा झाला आहे. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोराने शाळेत जाण्यापूर्वी आजीलाही गोळ्या घातल्या होत्या. गोळी लागल्याने आजीला सॅन अँटोनियो येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथं आजीवर उपचार सुरू असताना त्याने पळ काढला. यानंतर तो शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने अहवाल दिला आहे. त्यामध्ये टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी शाळेमध्ये गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरासोबत दोन घटना घडल्या होत्या. आधी त्याने आजीला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांनी शाळेजवळ एका वाहनालाही धडक दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने शाळेत प्रवेश करण्यापूर्वी बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. शाळेत प्रवेश करताना हल्लेखोराच्या हातात रायफल होती. यानंतर त्याने शाळेतील वेगवेगळ्या वर्गात जाऊन गोळीबार सुरू केला. या अपघातात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला.

कारवाई करण्याची वेळ आली आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपल्याला विचारायचे आहे की, देवाच्या नावाने आपण बंदुक लॉबीच्या विरोधात कधी उभे राहणार? तसेच देशातील प्रत्येक नागरिकाच्या वेदना कृतीत बदलण्याची हीच वेळ आहे. आपण या देशातील प्रत्येक निवडून आलेल्या अधिकाऱ्याला हे स्पष्ट केले पाहिजे की हीच कृती करण्याची वेळ आली आहे.

आज अनेक पालक आपल्या मुलांना पुन्हा पाहू शकणार नाहीत. मुले गमावल्याचे दु:ख म्हणजे जणू शरीरातून कोणीतरी आत्मा काढून घेतल्या सारखा आहे.