Ayatollah Khomeini : ट्रम्प यांच्या धमकीला इराणचा सर्वोच्च नेता खोमेनीकडून केराची टोपली, अमेरिकेला डायरेक्ट चॅलेंज

Ayatollah Khomeini : डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणचा सर्वोच्च नेता अयातोल्लाह खोमेनी याला धमकी दिली. पण याचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. उलट त्यानेच अमेरिकला चॅलेंज केलं आहे. इस्रायल इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. अजून अमेरिका या युद्धात उतरलेली नाही. अमेरिकेने हस्तक्षेप केला, तर हे युद्ध अजून भयावह होईल.

Ayatollah Khomeini : ट्रम्प यांच्या धमकीला इराणचा सर्वोच्च नेता खोमेनीकडून केराची टोपली, अमेरिकेला डायरेक्ट चॅलेंज
Israel Iran War
| Updated on: Jun 18, 2025 | 8:48 AM

इस्रायल इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. दररोज दोन्ही बाजूला मोठ नुकसान होत आहे. इस्रायलमध्ये तेल अवीव आणि हायफा या दोन शहरात मोठ नुकसान झालं आहे. इराणमध्ये तेल प्रकल्प, सैन्य तळ, लष्करी अधिकारी यांना लक्ष्य केलं जातय. इस्रायलच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा कमी आहे. इराणमध्ये जिवीतहानीचा आकडा सुद्धा जास्त आहे आणि बडे लष्करी अधिकारी मारले जात असल्याने त्यांचं रणनितीक नुकसान सुद्धा भरपूर झालय. या युद्धात आतापर्यंत तटस्थ दिसत असलेल्या अमेरिकेने उतरण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल माीडियावर पोस्ट करुन इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह खोमेनी यांना सरेंडर म्हणजे शरणागती पत्करायला सांगितली आहे. पण खोमेनी यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

अयातोल्लाह खोमेनी यांनी बुधवारी सकाळी एकापाठोपाठ एक टि्वटस केले. त्यांनी इस्रायलला ‘दहशतवादी झायोनिस्ट रेजीम’ म्हटलं तसच आता युद्धाची सुरुवात झालीय असं लिहिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला जुमानणार नसल्याचे खोमेनी यांनी एकप्रकारे संकेत दिले. “दहशतवादी झायोनिस्ट रेजीमला आपण कठोर प्रत्युत्तर दिलच पाहिजे. आम्ही झायोनिस्टना दया दाखवणार नाही” बुधवारी सकाळी इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ले केल्यानंतर अयातोल्लाह खोमेनी यांनी हे टि्वट केलं. फारसी भाषेत खोमेनी यांनी ‘युद्धाची सुरुवात’ असं लिहिलय. सोबत कॅस्टले गेटमध्ये एक माणूस हातात तलवार घेऊन जातानाचा फोटो त्यांनी पोस्ट केलाय. ऐतिहासिक खैबरच्या लढाईचा हा फोटो असल्याच दावा टाइम्स ऑफ इस्रायलने केला आहे.


‘आमचा संयम संपत चालला आहे’

“इराणच्या हवाई क्षेत्रावर आमचं वर्चस्व असून इराणचा सर्वोच्च नेता आमच्या टप्प्यात आहे” असं ट्रम्प यांनी काल ट्रूथ सोशलवर पोस्ट केलं होतं. “सुप्रीम लीडर कुठे लपून बसलाय हे आम्हाला माहित आहे. त्याला सहज लक्ष्य करता येईल. पण तिथे तो सुरक्षित आहे. सध्या तरी आम्ही त्याला मारणार नाही” असं ट्रम्पने म्हटलय. “नागरिक आणि अमेरिकन सैनिकांवर आम्हाला मिसाइल हल्ले नको आहेत. आमचा संयम संपत चालला आहे. विनाअट शरणगती” असं ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.