या कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना

या कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना


नवी दिल्ली : अमेरिकेत इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या वेतनावर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक वेतन देणारी कंपनी फेसबुक असल्याचे समोर आले आहे. फेसबुक त्यांच्याकडील इंटर्नला महिन्याला 8,000 अमेरिकन डॉलर म्हणजे तब्बल 5.6 लाख रुपये देते.

या सर्वेक्षणानुसार सध्या फेसबुकमध्ये जवळपास 2,800 नोकऱ्या आहेत. यानंतर अॅमेझॉनचा क्रमांक लागतो. अॅमेझॉन आपल्याकडील इंटर्नला महिना 7,725 अमेरिकन डॉलर देते. या व्यतिरिक्त सेल्सफोर्स, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर, ब्लुमबर्ग एल. पी., कॅपिटल वन अॅपल आणि बँक ऑफ अमेरिका यांचा पहिल्या 10 कंपन्यांमध्ये क्रमांक लागतो.

सर्वाधिक मासिक वेतन देणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कंपन्यांचे (Tech Companies) प्रमाण जास्त आहे. सर्वेक्षणातील या कंपन्यांचे प्रमाण जवळजवळ अर्धे (44 टक्के) आहे. तंत्रज्ञानानंतर फायनान्स आणि कन्सल्टींग कंपन्यांचा (Finance and Consultancy Company) क्रमांक येतो. सर्वोत्तम क्षमता असलेल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्या देखील अधिक वेतन देताना दिसत आहेत.

फेसबुक आणि अॅमेझॉननंतर सेल्सफोर्स आपल्या इंटर्नला प्रतिमहिना 7,667 अमेरिकन डॉलर,  इतर 5 कंपन्या 7,000 अमेरिकन डॉलर देतात. जर हा पगार पूर्ण वेळेसाठी दिला तर पगाराचा आकडा 84,000 अमेरिकन डॉलर प्रतिवर्ष होईल. हा आकडा अमेरिकेच्या सरासरी पगारापेक्षाही अधिक आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI