
येत्या दिवाळीत इस्राईल आणि हमासच्या युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हमासच्या विरोधात आता इस्राईल एका मोठ्या योजनेवर काम करीत आहे. ज्यामुळे एका नव्या संकटाला आमंत्रण मिळू शकते असे म्हटले जाते. अशी बातमी आहे की इस्राईल गाझापट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांना युद्धग्रस्त पूर्व आफ्रीकी देश दक्षिण सूदानमध्ये वसवणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी इस्राईलने सुदानशी चर्चा देखील सुरु केली आहे.परंतू ही चर्चा पुढे कितपत गेली याविषयी दुजोरा मिळालेली नाही.
इस्रायल आता गाझापट्टीतून येथील लोकांचे स्थलांतर घडवू इच्छीत आहे. गाझात गेल्या २२ महिन्यात हमास विरोधातील इस्राईलच्या कारवाईने उद्धवस्त झाला आहे. पॅलेस्टाईन जनतेचे सुदान येथे स्थलांतर करण्याच्या चर्चेतील प्रगती समजू शकलेली नाहीय परंतू ही योजना जर यशस्वी झाली तर पॅलेस्टाईनच्या लोकांची स्थिती आगीतून फूफाट्यात जाण्यासारखी होणार आहे. कारण सुदानही यादवीने ग्रस्त झालेला आहे.त्यामुळे मानवाधिकार संबंधीच्या चिंता वाढल्या आहेत.
पॅलेस्टीनी नागरिक, मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरेल असे म्हणत फेटाळला आहे. ही योजना जबरदस्ती हुसकावून लावण्याचा एक प्रकार आहे. पॅलेस्टीनी आता आपल्या भूमितून इस्राईल आपल्याला हुसकावून लावणार या भीतीने ग्रस्त आहे. हे पाऊल गाझापट्टीला हडपणे आणि येथे ज्यू लोकांना येथे पुन्हा वसवण्यास परवानगी देईल. इस्राईलच्या काही कट्टरपंथी मंत्र्यांनी तर तशीच मागणीच केलेली आहे.
दक्षिण सूदान २०११ मध्ये सुदानपासून स्वतंत्र झाल्यानंतर अर्धाकाळ युद्धग्रस्त होता. येथील लोक एका राजकीय संकटाचा सामना करत आहे. अलिकडेच राष्ट्राध्यक्ष सल्वा किर यांच्या सरकारने उपराष्ट्राध्यक्ष रीक माचार यांना नजरकैद केले आहे. त्यामुळे युद्धाचा धोका पुन्हा वाढला आहे. देशात भ्रष्टाचार वाढला आहे. त्यांच्या १.१ कोटी जनतेला अन्न पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. ट्रम्प प्रशासनाने मदतीत कपात केल्याने आव्हान आणखी खडतर झाले आहे.