
तब्बल चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव बघायला मिळत आहे. 2022 पासून युद्ध सुरू आहे. ज्यावेळी हे युद्ध सुरू झाले, त्यावेळी कोणीही साधा विचारपण केला नाही की, हे युद्ध तब्बल इतकी वर्ष चालेल. रशिया तीन ते चार दिवसांमध्ये युक्रेनवर ताबा मिळवेल, असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेसह नाटो देश युक्रेनची मदत करत आहेत. रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवण्यासाठी अमेरिकेनेच हे युद्ध पेटून दिल्याचे बोलते जाते. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच बोलता म्हटले होते की, आम्ही फक्त युक्रेनसोबत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम असा आहे की, संपूर्ण जग दोन भागात विभागले आहे. भारतासह अन्य देशांवर अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने थेट टॅरिफ लावला.
भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव होता आणि त्यामुळेच भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागली. मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेकडून मोठी प्रयत्न केली जात आहेत. यापूर्वी एक शांतता प्रस्ताव अमेरिकेने दोन्ही देशांना दिला. मात्र, युक्रेनने त्या शांतता प्रस्तावाला विरोध दर्शवला. सध्या अमेरिकेकडून दोन्ही देशांनी मान्य करावा, असा शांतता प्रस्ताव तयार केला जात आहे.
यासोबतच अमेरिकेला अत्यंत मोठे यश मिळाले असून चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच एका बैठकीत दोन्ही देश सहभागी होणार आहेत. युद्धादरम्यान शांतता करार पूर्ण होण्यापूर्वी एक बैठक घेतली जाईल. ज्यामध्ये अमेरिकेचे अधिकारी, रशियाचे अधिकारी आणि युक्रेनचे अधिकारी उपस्थित असतील. अबू धाबीमध्ये ही बैठक होणार आहे. थेट समोरा समोर बसून अधिकारी चर्चा करतील.
पुतिन यांच्यासोबतही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, विशेष म्हणजे ही बैठक काही तास सुरू होती. मॉस्को आणि कीव यांच्यातील शांततेच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होईल. पुतिन यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेला सांगितले आहे की, युक्रेनचा जो भाग आमच्या ताब्यात आहे तो कायमचाच ताब्यात राहिल आणि त्याला मान्यता द्या. मात्र, यागोष्टीलाच युक्रेनकडून विरोध केला जात आहे. युक्रेनचा जवळपास 20 टक्के भाग हा रशियाच्या ताब्यात आहे.