‘हे’ आहे जगातील सर्वात स्वस्त हॉटेल, फक्त 20 रुपयांमध्ये मिळतात ‘या’ सुविधा

Worlds Cheapest Hotel : पर्यटनासाठी किंवा काही कामासाठी अनेकजण दुसऱ्या शहरात जात असतात. ज्यावेळी आपण एखाद्या शहरात जातो त्यावेळी आपण एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करतो. एका रात्रीसाठी आपल्याला भाडे मोजावे लागते. आज आपण जगातील सर्वात स्वस्त हॉटेलची माहिती जाणून घेऊयात.

हे आहे जगातील सर्वात स्वस्त हॉटेल, फक्त 20 रुपयांमध्ये मिळतात या सुविधा
Chiepest Hotel
| Updated on: Oct 27, 2025 | 9:07 PM

पर्यटनासाठी किंवा काही कामासाठी अनेकजण दुसऱ्या शहरात जात असतात. ज्यावेळी आपण एखाद्या शहरात जातो त्यावेळी आपण एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करतो. एका रात्रीसाठी आपल्याला भाडे मोजावे लागते. अशातच आता पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एक हॉटेल सुरू झाले आहे आणि त्याची जगभरात चर्चा सुरु आहे. हे जगातील सर्वात स्वस्त हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र मुक्काम करण्यासाठी फक्त 70 पाकिस्तानी रुपये म्हणजे फक्त 20 भारतीय रूपये मोजावे लागतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानमधील या अनोख्या हॉटेलबाबत ट्रॅव्हल व्लॉगर डेव्हिड सिम्पसनने माहिती दिली आहे. डेव्हिडचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला इंस्टाग्राम, टिकटॉक आणि युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. डेव्हिडने या व्हिडिओमध्ये या हॉटेलमध्ये नेमकं काय मिळतं आणि त्याची किंमत किती आहे याबाबत माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील या हॉटेलमध्ये फक्त झोपण्यासाठी जागा, चहा आणि स्वच्छता या सुविधा मिळतात. ऑक्टोबर 2025 मध्ये समोर आलेल्या या व्हिडिओमुळे पाकिस्तानातील पर्यटनाला चालना दिली आहे. कारण यातून पाकिस्तान कमी बजेट असणाऱ्या प्रवाशांसाठी सिद्ध झाले आहे. मात्र इतक्या कमी किमतीत राहणे कसे शक्य आहे? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.

उंच इमारतीच्या छतावर झोपण्याची व्यवस्था

आपण जेव्हा हॉटेलमध्ये मुक्कामी असतो तेव्हा आपल्याला एक रूम मिळते. या रूममध्ये बेड आणि इतर सुविधा असतात. मात्र 20 रूपयांच्या हॉटेलमध्ये तुम्हाला इमारतीच्या छतावर एक खाट मिळेल. म्हणजेच तुम्हाला आकाशात तारे पाहत झोपावे लागेल. पेशावरमध्ये हे अनोखे हॉटेल आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीही पहायला मिळते.

कोणत्या सुविधा मिळणार?

हे हॉटेल विटा आणि दगडांनी बांधलेले आहे. यात पारंपारिक पश्तून वास्तुकलेची झलक पहायला मिळते. या हॉटेलमध्ये तु्म्हाला स्वच्छ चादरी, पंखा, एक कॉमन बाथरूम आणि मोफत चहा मिळतो. या हॉटेलमध्ये एसीची सुविधा नाही. या हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. येथे दररोज 50 ते 100 प्रवासी मुक्कामी असतात, यातील बरेचजण हे पर्यटक असतात.