
पाकिस्तान हा असा देश आहे, जिथं महागाई, गरिबी, भूकबळ ही फार मोठी समस्य आहे. पाकिस्तानमधील गरिबी दूर करण्यासाठी तेथील सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही. तेथ तेल, किराना, औषधं इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. पैसे कमवण्यासाठी पाकिस्तानात मोठा संघर्ष करावा लागतो. दरम्यान, आता पैशांसाठीचा असाच एक संघर्ष थेट पाकिस्तानच्या खासदारांमध्ये दिसून आला आहे. पैसे मिळावेत म्हणून तेथील खासदारांनी एखाद्या भिकाऱ्यालाही लाजवेल अशी कृती केली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा पाकिस्तानातील संसदेतील आहे. 8 डिसेंबर रोजीचा हा प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे. सभापती अयाज सादिक यांच्या हातात काही पाकिस्तानी रुपये होते. त्यांनी है पैसे कोणाचे आहेत? असे विचारताच साधारण 12 खासदार पुढे आले. त्यांनी हे पैसे माझाचे आहेत, असा दावा केला. तब्बल 12 खासदारांनी पैसे माझेच असल्याचा दावा केल्यानंत खुद्द सभापती अयाज सादिक यांनाही हसू आवरले नाही. पाकिस्तानी संसदेतही एकच हशा पिकला.
रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या संसदेत एका खासदाराचे पैसे पडले होते. हे पैसे नंतर सादिक यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर ते पैसे हातात घेतले आणि ते कोणाचे आहेत? असे विचारले. सादिक यांच्याकडून विचारणा झाल्यानंतर सभागृहात बसलेल्या 12 खासदारांनी हात वर केले आणि ते पैसे माझेच आहेत असा दावा केला. सादिक यांच्या हतात 5000 पाकिस्तानी रुपयांच्या एकूण 10 नोटा होत्या. म्हणजेच सादिक यांच्याकडे एकूण 50 हजार रुपयांच्या नोटा होत्या. ते पैसे मिळावेत म्हणून 12 खासदार पुढे आले.
🇵🇰 पाकिस्तान के Assembly में अध्यक्ष ने कुछ पैसा दिखाकर कहा कि “ये किसी के पैसे गिर गए है, जिनका है हाथ खड़ा करे”।
अब जितने पैसे नहीं थे उतने से अधिक सांसदों ने पैसे लेने के लिए अपना हाथ खड़ा कर दिया।😂🤣🤣 pic.twitter.com/fDeJ2xm4Qa
— Einstein Yadav (@GYdv28) December 9, 2025
दरम्यान, पाकिस्तानी 50 हजार रुपयांवर 12 खासदारांनी दावा केल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खासदारांचे हे असे वागणे चुकीचे आहे, असे मत काहीजण व्यक्त करत आहेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.