जगाने सोडला सुटकेचा नि:श्वास… ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा; अखेर थेटच बोलले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध युद्ध जिंकल्याची मोठी घोषणा केली आहे. केशम बेटावरील हल्ल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, इराण शांततेची विनंती करत आहे, यामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घोषणा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका आणि ट्रम्प यांच्या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

अमेरिका आणि इराण दरम्यान पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका सुरू असतानाच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केशम बेटावर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेने युद्ध जिंकलं आहे, अशी घोषणाच ट्रम्प यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर इराण युद्ध थांबवण्याची विनंती करत आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे जगाने नि:श्वास सोडला आहे. अमेरिका-इराण दरम्यान सीजफायरवर बऱ्याच काळानंतर करार झाला होता. पण नंतर हा सीजफायर मोडला होता.
‘वॉशिंगटन पोस्ट’ ने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. अमेरिकेने इराण विरोधातील युद्ध जिंकलं आहे. तेहरान शांततेची भीक मागत आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेने केशम बेटावर केलेल्या हल्ल्यात इराणला मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेने आमच्या नेत्यांना मारणं बंद करावं, असं आवाहनही इराणने केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
स्थानिक लोक हादरले
‘अल जजीरा’ने ही स्थानिक लोकांच्या हवाल्याने एक वृत्त दिलं आहे. इराणच्या केशम बेटावर पाच हल्ले झाले आहेत. स्थानिकांच्या मते, दोन विमानांना घिरट्या घालताना पाहिलं. स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या जवळ बंदर लेंगेहच्या जवळही काही स्फोट झाल्याची माहिती आहे. सागरी मार्गाने हल्ले करण्यात आले. या पूर्वीही या परिसरात हल्ल्याचे आवाज ऐकायला मिळत होते, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटल्याचं अल जजीराने म्हटलं आहे.
अमेरिकन ड्रोन पकडले
दरम्यान, अमेरिकेने यापूर्वी इराणवर मर्यादित हल्ले केले होते. पण अमेरिकेकडून थेट हल्ले केले जात नव्हते. मात्र, आता केशम बेटावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. दुसरीकडे इराणची सरकारी न्यूज एजन्सी आयआरएनएने सांगितले की, तेहरानच्या नौदलाने दोन अमेरिकन ड्रोन ताब्यात घेतले आहेत. त्यानंतर चार आणखी ड्रोन पकडले आहेत.
दरम्यान, अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत ट्रम्प यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. इराण विरोधातील युद्ध, महागाई आणि बेरोजगारी यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकन नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे मतदारांमध्ये प्रतिमा उजळण्यासाठी इराणविरोधातील युद्ध थांबवणं पण ते थांबवताना आपलाच विजय झाल्याचं भासवणं ट्रम्प यांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्याकडून विजयाची घोषणा केली असण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, युद्धाबाबत अमेरिकेने केलेल्या दाव्यावर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.