AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय..

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मोठी अटीतटीची लढत झाल्याचे या निकालावरून दिसत आहे. त्यातच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय या निवणुकीत झाल्याचे बघायला मिळतंय.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय..
MLA Gopichand Padalkar
| Updated on: Nov 03, 2026 | 9:58 AM
Share

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यादरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय झाला. गोपीचंद पडळकर यांना 54 मते पडली आहेत. ही निवडणूक प्रचंड रंगतदार झाली. गोपीचंद पडळकर यांनी थेट कोर्टात धाव घेतली होती. महाविकास आघाडीची विनोद पवार यांना पडली 34 मते आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा दणका बसला. भाजपाचा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोलबोला बघायला मिळत आहे. या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा लागल्या होत्या. बहुचर्चित ही निवडणूक होती. निवडणुकीच्या अगोदर आरोप प्रत्यारोपाचे जोरदार सत्र रंगताना दिसले. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजयी झाला. गोपीचंद पडळकर यांचा दबदबा या निडणुकीत बघायला मिळाला.

गोपीचंद पडळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात लढत होती. अखेर पडळकरांनी या निवडणुकीत बाजी मारली. पडळकरांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर त्यांच्या समर्थकांचा जल्लोष बघायला मिळत आहे. गुलाल उधळून हा जल्लोष केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक चर्चेत होती. गोपीचंद पडळकर यांचा निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा दावा करताना दिसले.

अखेर जिल्हा बँकमध्ये गोपीचंद पडळकर यांची दणदणीत एन्ट्री झाली. मोठ्या मताधिक्क्याने पडळकर निवडून आले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचे बघायला मिळाले. तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला. पणत्यांचा हा विजय फक्त एका मताने झाला. एक मत जास्त मिळाले ते निवडून आले.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव झाला. एक मत कमी पडल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आमदार रोहित पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पाटील मागील काही दिवसांपासून आपल्या आईचा प्रचार करत होते. मात्र, आत अवघ्या एका मताने त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. अहिल्यानगरमध्येही मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Follow Us
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी