AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara District Central Cooperative Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल, एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी आली पहिली गुड न्यूज, भाजपला दिला धक्का

Satara District Central Cooperative Bank Election : अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. यात साताऱ्यातून पहिला निकाल आला आहे. शिंदे गटासाठी गुड न्यूज आहे.

Satara District Central Cooperative Bank Election : सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल, एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी आली पहिली गुड न्यूज, भाजपला दिला धक्का
Eknath Shinde-shambhuraj desai
| Updated on: Nov 03, 2026 | 9:39 AM
Share

महाराष्ट्रातील तीन जिल्हा बँकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तीनही जिल्ह्यांतील निकालांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. जिल्हा बँकांवरील वर्चस्वासाठी विविध राजकीय गटांमध्ये चुरस आहे. मतमोजणीअंती कोणाच्या हाती जिल्हा बँकांची सत्ता जाणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान साताऱ्यात एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी पहिली गुड न्यूज आली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघात चुरशीचा सामना होता. पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शंभूराज देसाई यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांच्या निवडणूकीचा आज फैसला होणार आहे. गोपीचंद पडळकरांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पार पडलेल्या सहा जागांच्यासाठीच्या मतदानाची, मतमोजणी आज पार पडत आहे.सकाळी आठ वाजल्यापासून मिरज येथील बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.2 हजार 277 मतांची मोजणी होणार आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर,माजी खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार सुमनताई पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संजयकाका पाटलांना गुलाल लागणार का

सहा जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झालं होतं. आज या मतदानाची मतमोजणी होणार असून जिल्हा बँकेमध्ये गोपीचंद पडळकर यांची एन्ट्री होणार का? पारंपारिक लढतीमध्ये संजयकाका पाटलांना गुलाल लागणार का? याचा फैसला होणार असून याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.मिरजेतील शेतकरी भवन या ठिकाणी मतमोजणी होत आहे.  मागच्याच आठवड्यात विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिक्षक आणि पदवीधरच्या या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसला होता.  आता जिल्हा बँक निवडणूक निकालाकडे लक्ष आहे.

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा