AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींना कोण देणार टक्कर? पंतप्रधान पदासाठी विरोधकांकडे दावेदार कोण? या बड्या नेत्याने नावच केलं उघड

Omar Abdullah on Narendra Modi Rahul Gandhi: मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. मत चोरी, एसआयआरसह इतर मुद्यांवर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. मोदींसारखा विरोधी पक्षांकडे चेहरा नसल्याचा आरोप करण्यात येत असतानाच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

मोदींना कोण देणार टक्कर? पंतप्रधान पदासाठी विरोधकांकडे दावेदार कोण? या बड्या नेत्याने नावच केलं उघड
मोदींना कोण देणार टक्कर? पंतप्रधान पदासाठी विरोधकांकडे दावेदार कोण? या बड्या नेत्याने नावच केलं उघड
| Updated on: Nov 03, 2026 | 9:36 AM
Share

Omar Abdullah on Narendra Modi Rahul Gandhi: देशाच्या राजकारणात विरोधक सत्ता परिवर्तनासाठी मैदानात उतरले आहेत. मत चोरी, एसआयआरसह इतर अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विरोधकांचे आक्रमक सूर उमटत आहेत. निवडणूक आयोगासह इतर अनेक संस्थाविरोधात त्यांनी शड्डू ठोकले आहे. पण मोदींसारखा करिष्माई नेतृत्व विरोधकांकडे नसल्याचा आरोपही होत आहे. मोदींसारखा विरोधी पक्षांकडे चेहरा नसल्याचा आरोप करण्यात येत असतानाच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांच्यासमोर राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल असे पर्याय देण्यात आले. तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांचे थेट नाव घेतले.

राहुल गांधीच मुख्य चेहरा का?

उमर अब्दुल्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली. भारतात सध्या खऱ्या अर्थाने केवळ दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एक काँग्रेस आणि दुसरी भाजपा. इतर प्रादेशिक पक्षांना अथवा नेत्यांना आपण मोठे राष्ट्रीय नेते असल्याचा भ्रम आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हा केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित असतो. याउलट राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांना देशभरात एक मोठी ताकद आणि फायदा मिळतो. इतर नेत्यांकडे अशी राष्ट्रीय स्तरावरील ओळख नसल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. त्यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधान पदासाठी विरोधी खेम्यातील योग्य नेते असल्याचे जाहीर केले.

ते थेट संवाद साधतात

यावेळी उमर अब्दुल्ला यांनी यावेळी राहुल गांधी यांची बलस्थानंही सांगितली. राहुल गांधी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. त्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबींची समज आहे. सर्वात उत्तम बाबमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतात. गेल्या काही दिवसात राहुल गांधी यांचा राजकीय आलेख उंचावला आहे. ते जे मुद्दे घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविषयीची जागरूकताही लोकांमध्ये येत आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला. मी राष्ट्रीय नेता नाही. मी एका भागातील नेता आहे. राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचा भाग आहेत. त्याचा फायदा त्यांना देशभरातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी होतो असे अब्दुल्ला म्हणाले.

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा