
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांची बैठकीने जगभरात खळबळ माजली होती. ही बैठक रशिया आणि युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी मुख्यत्वे बोलावली होती. परंतू जगातील दोन महाशक्ती यांची भेट होणार म्हणून ही भेट गाजली.तेथे पुतिन यांनी असे काही केले की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प स्वत:च्या देशात ट्रोल झाले. एफ-22, बी-2 बॉम्बर्स, एफ-35 सारखे शक्तीशाली फायटर जेट देखील पुतिन यांना घाबरवू शकले नाहीत. वास्तविक पुतिन यांनी अमेरिकेतील त्या डिप्लोमॅटीक प्रोटोकॉललाही तोडले, ज्यात यजमान देशाचा राष्ट्राध्यक्षच संयुक्त प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करत असतो.
अलास्कात प्रोटोकॉल तोडून पुतिन यांची संयु्क्त पत्रकार परिषदेची सुरुवात केली. जी सर्वसामान्य विधीनिषेध तोडणारी होती. खरेतर जेव्हा कोणताही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोणा परदेशी समकक्ष नेताचा पाहुणचार करतो, तेव्हा संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवेदनाने होते. त्यानंतर पाहुण्यास बोलायची संधी दिली जाते. परंतू शुक्रवारी अलास्कात भलतंच घडलं. अलास्काच्या एंकोरेजमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीचे संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात केली, ते डोनाल्ड असतानाच, ही घटनाच हैराण करणारी म्हटली जात आहे. असे कधीही यापूर्वी झालेले नाही.
युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान युद्ध समाप्ती संदर्भातील बोलणी अखेर फिस्कटली. या बैठकीतून काही निष्पन्न झालेले नाही. दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही.
अलास्कात दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर पुतिन यांनी दावा केला की युक्रेनसंदर्भात सहमती बनली आहे. त्याच सोबत त्यांनी युरोपला इशारा केला कही त्यांनी प्रगतीत बाधा ठरु नये. पुतिन यांच्या दाव्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, जोपर्यंत कोणताही तोडगा निघत नाही. तोपर्यंत काहीही ठामपणे सांगता येऊ शकत नाही. ट्रम्प यांनी सांगितले की ते पुतिन आणि त्यांच्या दरम्यान झालेल्या बोलणीं सदर्भात माहिती देण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की तसेच युरोपच्या नेत्यांना बोलवणार आहेत.
बैठकीनंतर ट्रम्प यांनी सांगितले की,’ आमची बैठक खूपच फलदायी राहीली, अनेक मुद्यांवर सहमती झाली आहे.काही मुद्दे राहीले आहेत. ते काही एवढे महत्वाचे नाही. एक सर्वात महत्वाच्या बाबीची शक्यता ही आहे की आम्ही त्यावरही तोडगा काढू.’ तर दुसरीकडे पुतिन यांनी म्हटलेय की ट्रम्प या बाबीला नीट समजतात की रशियाचं स्वत:चे काही हितसंबंध आहेत. ते म्हणाले की रशिया आमि अमेरिकेला त्यांचा जुना अध्याय बंद केला पाहीजे. आणि सहकार्याच्या मार्गावर पुढे जात राहीले पाहीजेत.