युक्रेन वॉर क्राईम अंतर्गत पुतिन यांना ट्रम्प अटक करु शकतात का ? आंतरराष्ट्रीय कोर्टाने जारी केलेय वॉरंट
संपूर्ण जगाचे लक्ष ट्रम्प- पुतिन भेटीवर लागले होते. परंतू हे भेट निष्फळ ठरलीय, परंतू ट्रम्प पुतिन यांना आयसीसी वॉरंट अंतर्गत अटक करु शकतात का ? असा सवाल केला जात आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी रात्री उशीरा ( भारतीय वेळेनुसार ) अलास्का येथे भेट झाली होती. युक्रेन युद्ध प्रकरणात सुमारे तीन तास बैठक झाली. २०२२ नंतर युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच दौरा होता. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाने ( आयसीसी ) युद्ध गुन्हेगार म्हणून वॉरंट झाली केलेले आहे. अशा मग प्रश्न हा विचारला जात आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या वॉरंटच्या आधारे पुतिन यांना अटक करु शकतात का ?
पुतिन यांच्या विरोधात आहे अटक वॉरंट
१७ मार्च २०२३ रोजी आयसीसी ( आंतराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ) युक्रेन युद्ध आरोपांवरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अरेस्ट वॉरंट जारी केले. रशियाने युक्रेनच्या ताब्यातील क्षेत्रात मुलांना अवैध पद्धतीने निर्वासित करुन त्यांना रशियात स्थानांतरीत केले. हा एक आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मोठा गुन्हा मानला जातो.
कोण करणार पुतिन यांच्यावर कारवाई
या वॉरंट अंतर्गत पुतिन यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक प्रकारचे निर्बंध लावले गेले आहे. कारण आयसीसीचे १२४ सदस्य देशांना त्यांना अटक करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आयसीसीच्या वॉरंटला लागू करण्याची कायदेशीर अधिकार केवळ त्याच देशांना जे याचे सदस्य आहेत. रोम करारानुसार कोणत्याही व्यक्तींना तेव्हाच अटक करु शकतो तेव्हा आयसीसीच्या सदस्य असलेल्या देशाच्या सीमेत प्रवेश करेल.
ट्रम्प करणार पुतिन यांना अटक?
अमेरिका आयसीसीचा सदस्य नाही, याचा अर्थ अमेरिका कायद्याने पुतिन यांना आयसीसी वॉरंटआधारे अटक करु शकत नाही.यामुळे पुतिन यांच्या विरोधात आयसीसीने अटक वॉरंट जारी करुनही ट्रम्प त्यांना अटक करु शकत नाही. तर अलास्काच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला रशियन मिलिट्री बेसचे अंतर केवळ ८८ किमी आहे.परंतू रशियन अध्यक्ष पुतिन यांनी भेटीत आपले पारडे जड केले आहे. आता ट्रम्प यांनी युद्ध थांबवणे युक्रेनच्या हातात असल्याचे जुने पालपुद लावले आहे.
