पुतीन ज्या देशात जातात तेथे स्वत:चे पोर्टेबल टॉयलेटही घेऊन जातात, काय कारण ?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सोबतची सिक्युरिटी टीम नेहमीच्या त्यांच्यासोबत सावलीसारखी असते. आश्चर्य म्हणजे ज्या देशात ते जातात तेथे त्यांच्या सोबत स्वत:चे पोर्टेबल टॉयलेटही ते घेऊन जातात, काय आहे कारण?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी रात्री अलास्का येथे भेट झाली. युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धासंदर्भात जवळपास तीन तास ही बैठक झाल्याचे म्हटले जात आहे. साल २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरु झाल्यानंतर अमेरिकेत पुतीन यांचा हा पहिला दौरा होता. आज आपण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या संदर्भात एक विचित्र गोष्ट जाणून घेणार आहोत. पुतीन परदेश दौऱ्यासाठी जाताना सोबत स्वत:चे पोर्टेबल टॉयलेट देखील घेऊन जातात.
पुतीन सोबत प्रवासात असते ‘पू सूटकेस’
पुतीन जेव्हा कधी परदेशात असतात, तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचा खास ‘पू सूटकेस’ घेऊन जातात. त्याच्या त्यांचे मलमुत्र एकत्र ठेवले जाते. आणि हे मलमूत्र पुन्हा मॉस्कोला परत आणले जाते.याचे कारण पुतीन यांच्या सुरक्षेसाठी असे केले जाते. पुतीन यांची सुरक्षा टीम त्यांच्या परदेश दौऱ्यात बुलेटप्रुफ सुटकेस सोबत चालत असते. यात एक वेगळी सुटकेस असते तिला ‘पू सूटकेस’ म्हटले जाते. ही सुटकेस त्यांच्या मलमूत्राला एकत्र साठवणूकीसाठी केला जातो.
पुतीन असे का करतात ?
असे करण्यामागे पुतीन यांचे आरोग्य आणि खाजगी माहिती सुरक्षित ठेवणे हे कार्य असते. असे म्हटले जाते एखाद्याच्या मल आणि मूत्राच्या नमून्याची तपासणी केली तर त्याच्या शारीरिक स्थिती, आजार आणि एवढच काय उंची आणि जीवनशैली संदर्भात इत्यंभूत माहीती मिळवली जाऊ शकते. पुतीन यांच्या प्रतिस्पर्धी देशातील गुप्तचर संघटना पुतीन यांच्या आरोग्यासंदर्भातील माहितीची गैरवापर करु शकतात.त्यामुळे ही माहीती दडवण्यासाठी त्यांचे मलमूत्रही परकीय देशांना मिळू नये याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
अनेक अफवा उडाल्या
गेल्या काही वर्षात पुतीन यांच्या आरोग्या संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा उडाल्या आहे.काही बातम्यानुसार त्यांना कॅन्सर, डिमेंशिया वा पार्किंसन्सचा आजार असू शकतो असे म्हटले आहे. परंतू या दाव्यांना दुजोरा मिळालेला नाही. तरी देखील पुतीन त्यांच्या आरोग्या संदर्भात खूपच सतर्क आहे. तसेच त्यांच्या शारीरिक स्थिती संदर्भात कोणतीही बातमी लिक होऊ नये याची ते काळजी घेतात.
पोर्टेबल टॉयलेट सोबत घेऊन चालतात बॉडीगार्ड
साल २०१९ मध्ये पॅरीसमध्ये झालेल्या युक्रेन परिषदेदरम्यान पुतीन यांचे सहा बॉडीगार्ड्स यांच्या सोबत बाथरुममध्ये जाताना पाहीले गेले आहे. यातील एक गार्ड्स काम पुतीन बाहेर येताच त्यांचे मलमूत्र एकत्र जमा करणे. यासाठी खास पॅकेट सिल करुन सुटकेसमध्ये ठेवले जाते आणि ते मॉस्कोला नेले जाते. त्यासाठी त्यांच्या सोबतचा एक बॉडीगार्ड पोर्टेबल टॉयलेट सोबत घेऊन चालतो.म्हणजे मलमूत्र अन्य कुठे सोडण्याची गरज लागू नये.
