
एपस्टीन फाइल्सचा विषय सध्या जगभर गाजत असून त्यात विविध सेलिब्रिटी, राजकारणी, मान्यवर व्यक्तींचीनावे असल्याचे उघड झाले आहे. मात्र याच फाइल्समध्ये असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं नाव गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणातील 16 फाइल्सही उडवण्यात आल्याच्या चर्चा होत्या. याचप्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जेफ्री एपस्टाईनशी संबंधित कागदपत्रांच्या डेटाबेसमधून काढून टाकण्यात आलेला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो अमेरिकेच्या न्याय विभागाने पुन्हा प्रसिद्ध केला आहे जो होता. समीक्षेनंतर हे स्पष्ट झालं की फोटोमध्ये एपस्टाईनचे कोणतेही बळी दिसत नाहीत, म्हणून ते कोणतेही बदल न करता पुन्हा अपलोड करण्यात आले अशी सारवासारव विभागातर्फे करण्यात आली .
कोणता फोटो हटवला होता ?
या फोटोमध्ये एका उघड्या ड्रॉवरमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा फोटो असलेला एक डेस्क दिसत होता, त्यामध्ये ट्रम्प अनेक महिलांसोबत दिसत होते. मात्र संभाव्य पीडितांच्या सुरक्षिततेचा विचार करून, न्यू यॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याच्या कार्यालयाने फोटो समीक्षेसाठी चिन्हांकित केला होता.
न्याय विभागाकडून देण्यात आलं स्पष्टीकरण
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्याय विभागाने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन जारी केले. “त्या (फोटोंची) समीक्षा केल्यानंतर, असं आढळून आलं की त्या फोटोमध्ये जेफ्री एपस्टाईनच्या कोणत्याही पीडितांचे चित्रण असल्याचा कोणताही पुरावा नाही. म्हणून, तो फोटो कोणत्याही बदलाशिवाय किंवा एडिटिंगशिवाय पुन्हा पोस्ट करण्यात आला आहे.” असं त्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
फोटोमधील महिलांच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असे डेप्युटी ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी यापूर्वी सांगितले होते . त्याचं राष्ट्राध्यक्षर ट्रम्प यांच्याशी काही घेणंदेणं नसल्याचंही त्यांनी
NBC च्या Meet the Press with Kristen Welker मध्ये नमूद केलं होतं.
एपस्टीनशी संबंधित हजारो कागदपत्रं जारी
शुक्रवारी न्याय विभागाने जेफ्री एपस्टाईनशी संबंधित हजारो कागदपत्रे प्रसिद्ध केली. एपस्टाईन हा एक लैंगिक गुन्हेगार होता, त्याने 2019 साली तुरुंगात आत्महत्या केली. मात्र, या कागदपत्रांमध्ये केलेल्या मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि ट्रम्प यांचा कमीत कमी उल्लेख केल्याबद्दल विभागाला, काही रिपब्लिकन नेत्यांसह, टीकेचा सामना करावा लागला. संपूर्ण प्रकरणाची पूर्णपणे आणि निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे अशी मागणी डेमोक्रॅटिक हाऊस मायनॉरिटी लीडर हकीम जेफ्रीज यांनी एका मुलाखतीत केली होती.