
Ashwini Vaishnav: एकीकडे अमेरिका भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकत आहेत. आता तर भारतावर 500 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचे विधेयक धडकले आहे. अशा सर्व परिस्थितीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी अमेरिकेत एका महत्त्वाच्या बैठकीला हजेरी लावली. क्रिटिकल मिनरल्स मंत्रीस्तरीय बैठकीत मंगळवारी ते सहभागी झाले. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. Rare Earth Minerals विषयी या बैठकीत चर्चा झाली. पृथ्वीच्या पोटात दडलेल्या या महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीला बळकट आणि सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत धोरणात्मक क्षेत्रातील असुरक्षिततेवर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे व्यापारी धोरणावरुन वाजलेले असले तरी दोन्ही देशातील सौहार्द संपलेला नसल्याचे दिसून येते.
भारतासाठी दुर्मिळ खनिजं महत्त्वाचीच
स्कॉट बेसेंट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध देशांच्या अर्थमत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली. या बैठकीत पृथ्वीच्या पोटात दडलेल्या दुर्मिळ खनिजांबाबत (Rare Earth Elements) महत्त्वाची चर्चा झाली. या खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करण्याबाबतच्या उपाययोजना चर्चिला गेल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ANI या वृत्तसंस्थेला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, अमेरिकेचे ट्रेझरी स्कॉट बेसेंट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. भारतात उत्पादन क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन झपाट्याने वाढले आहे. भारतासह इतर देशांसाठी क्रिटिकल मिनरल्सची पुरवठा साखळी ही लवचिक आणि मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची असल्याचे वैष्णव म्हणाले.
या बैठकीत या दुर्मिळ खनिजाविषयी विविध देशांतील प्रतिनिधींमध्ये माहितीच आणि अनुभवाची देवाणघेवाण झाल्याचे वैष्णव यांनी सांगितले. तर ही पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्यासाठी काय पावलं उचलावीत याविषयावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. या बैठकीत या दुर्मिळ खनिजांचे शुद्धीकरण आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. यामुळे उच्च दर्जाचे दुर्मिळ खनिजं अधिकाधिकरित्या आणि शाश्वत पद्धतीनं उपलब्ध होतील यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे सर्वच देशांनी एकत्रिकृत प्रकल्पासाठी निधीची उभारणी आणि विविध देशातील तंत्रज्ञान सामायिकरणावरही चर्चा केली.
#WATCH | Washington, DC: Union Minister Ashwini Vaishnaw says, “US Treasury Secretary Scott Bessent organised a ministerial meeting focused on resilience in the supply chain of critical minerals. As we all know, and especially in India, when the manufacturing sector is growing… pic.twitter.com/qpB4Dk3NQH
— ANI (@ANI) January 13, 2026
दुर्मिळ खनिजांची कमतरता भरून काढण्याचे आवाहन
दरम्यान ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंबंधीची पोस्ट केली. या अर्थमंत्री स्तरीय बैठकी विविध देशांच्या प्रतिनिधी सहभाग नोंदवला. दुर्मिळ खनिजांच्या पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवे साधण्याचे आणि कमतरता भरून काढण्याविषयी सर्व देशांनी सहमती दर्शवल्याने आनंद झाला. हे सर्व देश विभिक्त होण्याऐवजी एकत्रित येऊन काम करतील आणि जोखीमेसह एकत्रित काम करतील अशी आशा आहे. या बैठकीत सहभागी देशांमध्ये दुर्मिळ खनिजाच्या पुरवठा साखळीतील प्रमुख त्रुटी त्वरीत दूर करण्यासाठी मजबूत आणि एकत्रित बांधिलकी दिसून आली.
At today’s Finance Ministerial hosted by the @USTreasury, I was pleased to hear a strong, shared desire to quickly address key vulnerabilities in critical minerals supply chains.
I am optimistic that nations will pursue prudent derisking over decoupling and understand well the… pic.twitter.com/vh23ljcDRI
— Treasury Secretary Scott Bessent (@SecScottBessent) January 12, 2026
या बैठकीत युनायटेड किंगडम, कॅनडा, युरोपियन यूनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, मॅक्सिको, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलियातील अर्थमंत्र्यांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. त्यामुळे या विषयावर आंतरराष्ट्रीय एकमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध दुर्मिळ खनिजांची विस्कळीत पुरवठा साखळी मजबूत करणे आणि कमतरता भरून काढण्यावर पोषक चर्चा झाली. पुरवठा साखळीतील सध्याची कमतरता दूर करण्याची गरज सर्वांनी मान्य केली आहे, अशी दीर्घ प्रतिक्रिया त्यांनी या पोस्टमध्ये दिली.