कोणती कंपनी तयार करते Boroplus? मालक या धर्माचे अनुयायी
Boroplus Company: बोरोप्लस हे सौंदर्य उत्पादन अनेकांच्या घरात आढळते. थंडीत ही क्रीम अनेक घरात दिसते. ग्रामीण भागातही तिचा वापर होतो. पण ही क्रीम कोणती कंपनी तयार करते हे तुम्हाला माहिती आहे का? कंपनीचे मालक हे कोणत्या धर्माचे अनुयायी आहेत.

Boroplus Company: थंडीत त्वचेसाठी बोरोप्लस ही क्रीम अनेकांच्या घरी वापरल्या जाते. बोरोप्लस हे नाव ग्रामीण भागातही ओळखले जाते. अनेक घरात स्त्रीयाच नाही तर पुरुषही वापरतात. विशेषतः हिवाळ्यात ही क्रीम अधिक वापरली जाते. पण ही क्रीम कोणती कंपनी बाजारात आणते. तिचे उत्पादन करते हे अनेकांना माहिती नाही. या कंपनीचे मालक कोण आहेत आणि ते कोणत्या धर्माचे अनुयायी आहेत, असा सवाल गुगलवर अनेकदा विचारला गेला आहे. कोणती कंपनी तयार करते ही क्रीम?
Boroplus कोण तयार करतं?
बोरोप्लस अँटीसेप्टिक क्रीम इमामी लिमिटेड (Emami Limited) नावाची भारतीय कंपनी तयार करते. FMCG क्षेत्रातील ही महत्त्वाची आणि वेगाने पुढे जाणारी कंपनी आहे. ही कंपनी पर्सनल केअर, आरोग्य आणि आयुर्वेदिक उत्पादनं तयार करण्यात अग्रेसर आहे. बोरोप्लसशिवाय ही कंपनी नवरत्न, झंडू बाम, फेअर अँड हँडसम, केश किंग यासारखे अनेक उत्पादनासह बाजारात उतरलेली आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओत सध्या बाजारात विक्री होणारे अनेक उत्पादनांची यादी आहे.
इमामी कंपनीची सुरुवात झाली कशी?
इमामी लिमिटेडची स्थापना वर्ष 1974 मध्ये झाली होती. राधेश्याम अग्रवाल आणि राधेश्या गोयनका यांनी ही कंपनी स्थापन केली. हे दोघेही बालपणापासूनचे मित्र, कोलकत्ता येथे दोघांचे शिक्षण झाले. दोघेही नोकरीला लागले. पण त्यात मन रमले नाही. नोकरी सोडून केवळ 20 हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी इमामी कंपनीची सुरुवात केली. त्याकाळी लायसन राज होते. पण लोकांना दर्जेदार उत्पादन हवे असल्याचे दोघांनी हेरले आणि बाजारात उत्पादन आणले.
बोरोप्लस असं झालं लोकप्रिय
बोरोप्लसने सुरुवातीला बाजाराचा अभ्यास करुन दैनंदिन जीवनात वापरता येईल असं उत्पादन आणण्याचा प्रयत्न केला. बोरोप्लस अँटिसेप्टिक क्रीम बाजारात उतरवण्यात आली. पुढे ही क्रीम त्वचेच्या कुरबुरीवर वापरली जाऊ लागली. हिवाळ्यात तिची मागणी अधिक वाढली. कमी किंमत आणि गावापर्यंत पोहचण्याचे धाडस या रणनीतीवर कंपनीने कमी कालावधीत मोठी झेप घेतली.
मालकाचा धर्म कोणता?
बोरोप्लस वा इमामी कंपनीच्या मालकाचा धर्म कोणता हा एक सवाल विचारल्या जातो. तर इमामी ही एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. संस्थापकांनी आता कंपनी पुढील पिढीच्या हाती सोपावली आहे. हर्ष अग्रवाल आणि मोहन गोयनका हे कंपनीचे संचालक आहेत. दोघेही हिंदू आहेत. कंपनीचा व्यवसाय आता जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.
