भारत-पाकिस्तानच्या वादात आता सर्वांत पावरफुल संस्थेची एन्ट्री, घेतलेल्या भूमिकेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं!

दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवला आहे. दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापले सैन्य सज्ज ठेवले आहे.

भारत-पाकिस्तानच्या वादात आता सर्वांत पावरफुल संस्थेची एन्ट्री, घेतलेल्या भूमिकेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं!
INDIA VS PAKISTAN
| Updated on: May 05, 2025 | 10:57 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवला आहे. दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापले सैन्य सज्ज ठेवले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता जगातील सर्वांत महत्त्वाची आणि जगाला दिशा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भारत-पाकिस्तान वादावर भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारत-पाकिस्तानकडे लागले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने नेमकं काय म्हटलंय?

संयुक्त राष्ट्र संघटनेने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि पाकिस्तानला सल्ला दिला आहे. लष्करी कारवाई हा उपाय नाही, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे.

पाकिस्तानकडून दिली जातेय धमकी

पहलगामची घटना घडल्यानंतर पाकिस्तानने भारताला आतापर्यंत अनेकवेळा धमकी दिली आहे. तिथले राष्ट्रीय पातळीवरील नेते भारताविरोधात गरळ ओकत आहेत. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, अशा प्रकारची धमकी पाकिस्तानचे नेते देत आहेत. तर भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत, आमचे सैन्य सज्ज आहे, असं पाकिस्तानचे सत्ताधारी सांगत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराकडून वेगवेगळ्या हालचालीही झालेल्या दिसत आहेत. काही अनपेक्षित घडलंच तर उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करदेखील तयार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन्ही देशांना लष्करी कारवाई हा काही वाद मिटवण्याचा पर्याय नाही, असं म्हटलंय.

गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांत हा तणाव आहे. पण आता मात्र हा तणाव परमोच्च पातळीवर पोहोचला आहे, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या सल्ल्यानंतर पाकिस्तान काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दिल्लीत मोठ्या घडामोडी

दरम्यान, भारताची राजधानी दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणंत्री यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगतिलं आहे.