अमेरिकेने थेट केला हल्ला, अमेरिकन सैन्याचे रात्रभर हवाई हल्ले, नायजेरियातील..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. आता नुकताच अमेरिकेने मोठे हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्थ केली आहेत. नुकताच त्याबद्दलची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

अमेरिकेने थेट केला हल्ला, अमेरिकन सैन्याचे रात्रभर हवाई हल्ले, नायजेरियातील..
us ISIS terrorist targets in Nigeria
| Updated on: Dec 26, 2025 | 7:55 AM

अमेरिकेमध्ये ख्रिसमसचे जोरदार सेलिब्रिशन सुरू आहे. त्यामध्येच अमेरिकेने नायजेरियातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले इतके जास्त भयंकर होते की, दहशतवाद्यांची अड्डे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. ऐन ख्रिसमसच्या दिवशी अमेरिका असे काही करेल याचा अंदाज कोणालाही नव्हता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्ट्राइकबद्दल माहिती दिली. ट्रम्प यांनी म्हटले की, हा दहशतवादी गट त्या प्रदेशातील ख्रिश्चनांना टार्गेट करून त्यांची हत्या करत होता. शेवटी स्ट्राइक करून दहशतवादी हल्ले अमेरिकेने उद्धवस्थ केली. ट्रुथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दलची माहिती दिली आणि स्पष्टपणे म्हटले की, माझ्या आदेशानंतर ही हल्ले करण्यात आली. नायजेरियाच्या वायव्येकडील आयएसआयएसच्या दहशतवादी तळांना टार्गेट करून हल्ला करण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, आज रात्री माझ्या आदेशाप्रमाणे, नायजेरियाच्या वायव्य भागातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना टार्गेट करत हल्ले करण्यात आली. हे दहशतवादी निष्पाप ख्रिश्चनांची निर्घृणपणे हत्या करत आहेत. हिंसेची पातळी अनेक वर्षांत आणि शतकांमध्येही अभूतपूर्व आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने या दहशतवाद्यांना अगोदरच मोठा इशारा दिला होता.

त्यांनी ख्रिश्चनांची होणारी हत्या थांबवण्यास सांगितल होते. जर त्यांनी तसे केल नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. या लष्करी कारवाईत अमेरिकेने अनेक हवाई हल्ले केले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ही कारवाई केली. युद्ध विभागाने अनेक अचूक हल्ले केले असून दहशतवाद्यांना पळता भुई कमी केली. अनेक दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले.

माझ्या नेतृत्वाखाली, आपला देश कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला फोफावू देणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प ऐन ख्रिसमसच्या दिवशी याबद्दलची माहिती शेअर केली आहे. अमेरिकेत मोठा उत्साह लोकांमध्ये ख्रिसमसचा बघायला मिळत आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर जगात मोठी खळबळ उडाली आहे.