
रशिया आणि जपान नंतर आता अमेरिकेवर निसर्ग कोपला आहे. अमेरिकेत महाभूकंप झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 8.0 इतकी होती. दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ड्रेक पॅसेज या भागात भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. ड्रॅक पॅसेज हा एक खोल आणि अरूंद समुद्री मार्ग आहे. हा मार्ग दक्षिण आणि पश्चिम अटलांटिक महासागरांना आणि दक्षिण-पूर्व प्रशांत महासागराला जोडतो.
अमेरिकेन समुद्र किनाऱ्यावर सदूर या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. अनेक जण भयभीत झाले. सगळीकडं एकच गदारोळ उडाला. या भूकंपाने किती नुकसान झाले, जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण समुद्र किनाऱ्या लगतच्या भागांना गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्सुनामी संबंधीचे इशारा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. समुद्रात दैत्य दिसल्याच्या अफवांमुळे जपानपासून अमेरिकेतील समुद्रकिनाऱ्यापर्यंत त्सुनामीचा कहर येणार अशी किवंदती पसरलेली आहे. जुलै पासून याविषयीच्या वृत्तांनी कहर केला आहे. त्यात या शक्तीशाली भूकंपाने नागरीक भयभीत झाले आहेत.
भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात 10 किलोमीटर खोल
युएसजीएस डेटाच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात 10 किलोमीटर खोलवर आहे. जमिनीच्या सात टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना घासतात. त्या एकमेकींवर अधिक्रमण करतात. तेव्हा घर्षणामुळे भूकंप येतो. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर मॅग्नीट्यूड स्केल हे परिमापक वापरण्यात येते. त्याआधारे भूकंप किती तीव्रतेचा होता याची माहिती समोर येते. त्याचे परिणाम समोर येतात. भूकंपाची तीव्रता जितकी अधिक तेवढे नुकसान वाढते.
रिश्टर मॅग्नीट्यूड स्केल 1 ते 9 या मापकात मोजली जाते. भूंकपाची तीव्रता त्याचा केंद्रबिंदू म्हणजे एपिसेंटरपासून मोजली जाते. त्या केंद्रातून जी ऊर्जा बाहेर पडते, ती या स्केलवर मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेचा भूकंप असतो. तर 7.5 पुढील तीव्रतेचा भूकंप हा धोकादायक मानण्यात येतो. रिश्टर स्केलवर 9 तीव्रतेचा भूकंप हा महाविनाशकारी आणि निसर्गाचा कोप ठरतो. रिश्टर स्केलवर भूकंप 7 तीव्रतेचा असेल तर आजूबाजूच्या 40 किलोमीटर परिसरात मोठे हादरे बसतात. या 30 जुलै रोजी रशियाच्या कामचटका द्वीपसमूहात 8.8 तीव्रतेचा हा महाभूकंप आला होता. हा द्वीपसमूह हा जपानच्या अगदी जवळ आहे. हे क्षेत्र Pacific Ring of Fire मध्ये येते. या भूकंपाचे धक्के अलास्कापर्यंत जाणवले होते.