मोठा दणका, भारताला अमेरिकेची थेट धमकी, FCRA विधेयक संसदेत मंजूर केले तर याद राखा..

पुन्हा एकदा अमेरिकेने भारताला धमकी दिली आहे. यावेळी रशियाचे तेल नाही तर संसदेत मंजूरीसाठी येणारे एक विधेयक ठरले आहे. जर भारताने हे विधेयक मंजूर केले तर त्याचा वाईट परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर होऊ शकते, असे सांगितले जातंय.

मोठा दणका, भारताला अमेरिकेची थेट धमकी, FCRA विधेयक संसदेत मंजूर केले तर याद राखा..
US
| Updated on: Aug 05, 2026 | 10:58 AM

भारताच्या विदेशी फंडिंगसोबत जोडलेले FCRA विधेयकाचा वाद आता जागतिक पातळीवर पोहोचला. अमेरिका यावर भडकली आहे. अमेरिकेच्या खासदाराने थेट म्हटले की, यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडू शकतात. भारताला या विषयात मोठी धमकी देण्यात आली. हे विधेयक संसदेत न आणण्यासाठी भारतावर आता अमेरिकेतून दबाव टाकला जात आहे. सरकार संसदेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. संसदेत हे विधेयक आणले जाईल. तशी तयारी सरकारकडून सुरू आहे. सरकारच्या म्हणण्यांनुसार, या विधेयकाने विदेशातून येणाऱ्या फंडिंगवर अधिक पारदर्शकता येईल. मात्र, हेच आता अमेरिकेला पटत नाही. भारतात विदेशातून मोठा पैसा येतो. मात्र, त्यात पारदर्शकता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला.

अमेरिकेचे खासदार राइली मूर यांनी या विधेयकाविरोधात संताप व्यक्त केला. राइली मूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, भारतातील ईसाई लोकांचा इतिहास सांगत त्यांनी या विधेयकाला विरोध केला. यीशु मसीह काही वर्षानंतर सेंट थॉमस मलाबर आले होते. त्यावेळीपासून भारतात ईसाई राहतात. ईसाई इतिहास देखील आहेत.

त्यानंतरही भारत संसदेत FCRA नियमांचे संशोधन विचार करत आहे. कारण त्यांना या सर्व संस्थांवर आपला अधिकार पाहिजे. जर भारताने संसदेत हे विधेयक आणले तर याचा थेट परिणाम भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय संबंधांवर होईल. या विधेयकाला भारतातून नाही तर विदेशातून विरोध होत आहे. आता यावर भारत नक्की काय निर्णय घेतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

थेट अमेरिकेतून विरोध होत आहे. अमेरिकेच्या विरोधानंतरही भारत सरकार काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण जर हे बिल संसदेत मंजूर करण्यात आले तर दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. त्याच आता हे विधेयक वादाचा मुद्दा ठरताना दिसतंय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us