VIDEO : प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतील; अमेरिकन नौदलाच्या जवानांनी गायलं ‘ये जो देस है तेरा’

| Updated on: Mar 29, 2021 | 8:26 AM

गाण्याचा व्हीडिओ ट्विटवर दोन कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे. | US Navy ye jo des hai tera

VIDEO : प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतील; अमेरिकन नौदलाच्या जवानांनी गायलं ये जो देस है तेरा
हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील.
Follow us on

वॉशिंग्टन:  वॉशिंग्टन येथे नुकतीच अमेरिकन नौदलाचे प्रमुख एम. गिल्डे आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांची बैठक पार पडली. या कार्यक्रमातील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (US Navy members sing popular Hindi song Indian envoy shares video)

एम. गिल्डे यांनी भारतीय राजदूताच्या सन्मानार्थ एका मेजवानीचे आयोजन केले होते. त्यावेळी अमेरिकन नौदलाच्या बँडने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’ या चित्रपटाली ‘ये जो देस है तेरा’ (Ye jo des hai tera) हे गाणे सादर केले. हे गाणं ऐकून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील. अमेरिकन सैनिकांचे गाण्यातील शब्दांचे उच्चार इंग्रजाळलेले असले तरी गाण्यातील राष्ट्रभक्तीचा भाव कुठेही कमी पडताना दिसत नाही.

राजूदत तरनजीत सिंग संधू यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे गाणे शेअर केले होते. तेव्हापासून या गाण्याचा व्हीडिओ ट्विटवर दोन कोटीहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘भारत आणि अमेरिकेतील मैत्रीचा बंध कधीच तुटू शकत नाही’

अमेरिकन नौदलाच्या सैनिकांनी या गाण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे सोशल मीडियावर अनेकजण कौतूक करत आहेत. अनेकांकडून त्यांची वाहवा होत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचा बंध कधीच तुटू शकत नाही, असे भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी हा व्हीडिओ शेअर करताना म्हटले होते होते.

इतर बातम्या:

सौदी अरबमध्ये पुरुषांवर ‘या’ 4 देशांमधील महिलांशी लग्न करण्यास निर्बंध, पाकिस्तानसह कोणत्या देशांचा समावेश?

भाजीसाठी 163 रुपयांच्या गोगलगाय आणल्या, कोट्यावधीचा मोती सापडल्याने गरीब महिलेचं नशिब फळफळलं

VIDEO: 800 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक, त्याच लाव्हारसावर जेवण करुन खाणारा बहाद्दर, व्हिडीओ पाहा…

(US Navy members sing popular Hindi song Indian envoy shares video)