Iran vs Israel US War : युक्रेन काय आम्हाला..अमेरिकेला हाच माज नडला, आज इराण विरुद्ध युद्धात US ला त्याचीच मोठी किंमत चुकवावी लागतेय

Iran vs Israel US War : एक छोट्याशा देशाची मदत नाकारणं आज अमेरिकेला महाग पडत आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिकेने 28 फेब्रुवारीपासन युद्ध पुकारलय. इराणवरील अमेरिकेचे हल्ले यशस्वी होत असले तरी अमेरिकेला सुद्धा झळ सोसावी लागतेय.

Iran vs Israel US War : युक्रेन काय आम्हाला..अमेरिकेला हाच माज नडला, आज इराण विरुद्ध युद्धात US ला त्याचीच मोठी किंमत चुकवावी लागतेय
Ukraine-USA
| Updated on: Mar 11, 2026 | 2:14 PM

सात महिन्यापूर्वी युक्रेनने अमेरिकेला कमी किंमतीच्या इंटरसेप्टर ड्रोनची ऑफर दिली होती. सोबत सेन्सर्स असलेली छोटी एअर डिफेन्स सिस्टिम होती. इराणी बनावटीच्या ड्रोन्सचा सामना करण्यासाठी ही सिस्टिम ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या या ऑफरमध्ये फार रस दाखवला नाही. त्यांनी ही सिस्टिम खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. आता पश्चिम आशियात इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु झालय. त्यावेळी इराण आखातामधील अमेरिकन तळांना शाहेद ड्रोनद्वारे लक्ष्य करत आहे. अमेरिकेला आता युक्रेनच्या मदतीची गरज भासली आहे. अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात केली. त्यांनी इराणच्या आत खोलवर हल्ले केले.

इराणमधील अनेक लष्करी तळ नष्ट केले. इराणचे सुप्रीम लीडर आयातोल्लाह अली खामेनी यांनाही संपवलं. त्यानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातामधील मित्र देशांवर ड्रोन्स, मिसाइलद्वारे हल्ले केले. अमेरिकेन बेसेसना इराणने शाहेद ड्रोनव्दारे लक्ष्य केलं. युक्रेनी अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी युद्धात चाचणी झालेली ही टेक्नोलॉजी अमेरिकेला विकण्याचा प्रयत्न केला. इराणी ड्रोन्स पाडण्याचा अनुभव त्यांच्याकडे होता. ते पावर पॉइंट प्रेझेंटेशन करायलाही तयार होते. ही सिस्टिम अमेरिकन सैन्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पश्चिम आशियात कसा बचाव करु शकते.

तेच त्यांनी अमेरिकेला देऊ केलं

शाहेद ड्रोन्सचा कसा सामना करायचा याचा युक्रेनकडे सर्वात जास्त अनुभव आहे. कारण रशियाने इराणकडूनच ही ड्रोन्स विकत घेऊन युक्रेनवर हल्ले केले. त्यामुळे हे ड्रोन हल्ले परतवून लावण्यासाठी युक्रेनने आपलं तंत्रज्ञान विकसित केलं. तेच त्यांनी अमेरिकेला देऊ केलं.

मोठी रणनिती चूक

मागच्यावर्षी 18 ऑगस्टला व्हाइट हाऊसमध्ये बैठक झाली. त्यावेळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला हे इंटरसेप्टर ड्रोन्स देऊ केले. रशियाविरोधात अमेरिकेने जी मदत केली, त्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून युक्रेनने ही मदत ऑफर केली. युक्रेनची ही मदत नाकारणं ही मोठी रणनिती चूक आहे असं आता ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाटत आहे. कारण आता या शाहेद ड्रोनद्वारेच इराण अमेरिकन तळ आणि आखाती देशांवर हल्ले करत आहेत.

 

Follow Us