AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी धावून आला हा देश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीचे ठिकाण आणि तारीख ठरली

टॅरिफमध्ये वाढ झाल्याने भारत चिंतेत आहे. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. मात्र, भारत अमेरिकेसमोर अजून झुकला नसल्याचे बघायला मिळतंय. आता त्यामध्येच मोठ्य घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.

भारतासाठी धावून आला हा देश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीचे ठिकाण आणि तारीख ठरली
donald trump and narendra modi
| Updated on: Aug 09, 2025 | 7:34 AM
Share

अमेरिकेकडून भारतावर मोठा कर लादण्यात आलाय. टॅरिफमध्ये वाढ झाल्याने भारत चिंतेत आहे. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. मात्र, भारत अमेरिकेसमोर अजून झुकला नसल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका प्रश्नाला उत्तर देताना भारतासोबतच्या व्यापार संबंध तोपर्यंत पुढे जाणार नाहीत, जोपर्यंत हा विषय निकाली लागणार नाही, असे म्हटले होते. भारत रशियाकडून कच्चे तेल विकत घेत असल्याची पोटदुखी डोनाल्ड ट्रम्पला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत होणार भेट 

डोनाल्ड ट्रम्पने जाहीरपणे बोलून दाखवले की, भारताकडून आम्ही वस्तू खरेदी करतो पण भारत आमच्याकडून नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाच्या विरोधात भारताच्या बाजूने काही देशही उभे असल्याचे बघायला मिळतंय. आता त्यामध्येच मोठा घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळतंय. यादरम्यानच अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे ष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट होणार आहे.

ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष 

हेच नाही तर अमेरिकेने ज्याप्रकारे भारतावर कर लादला आहे, त्यानंतर पुतिन भारतात येणार असल्याचेही सांगितले जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी घोषणा केली की, ते 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतील. या भेटीबद्दलची पोस्ट त्यांनी थेट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या भेटीकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय.

भेटीमध्ये विविध विषयांवर होणार चर्चा 

युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध मागील काही दिवसांपासून सुरू आहे, ते बंद करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्याकडून युक्रेनला पाठिंबा देखील दिला जातोय. भारताच्या प्रत्येक मदतीला कायमच रशिया धावून आलाय. आता यावेळी रशियाकडून भारताला कशाप्रकारे मदत होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या भेटीमध्ये भारतावर लावण्यात आलेल्या कराबद्दल देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप