इराणवर इतिहासातील सर्वात भयंकर हल्ला! जगात हाहाकार, थेट होर्मुझच्या सामुद्रधुनी…

अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 15 वा दिवस आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. स्थिती भयंकर बनली आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून धक्कादायक दावा करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

इराणवर इतिहासातील सर्वात भयंकर हल्ला! जगात हाहाकार, थेट होर्मुझच्या सामुद्रधुनी...
Big Attack Iran
| Updated on: Mar 14, 2026 | 8:00 AM

अमेरिका आणि इराण युद्धाला आता पंधरा दिवस पूर्ण होतील. मात्र, या युद्धामुळे जग जेरीस आले. अनेक देश संकटात सापडली असून कच्चे तेल आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. इराणकडून इस्त्रायल आणि आखाती देशांमध्ये क्षेपणास्त्र टाकली जात आहेत. मात्र, होर्मुज सागरीमार्ग इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिकेवर दबाव वाढला आहे. सर्वकाही ठप्प झाले. भारतातही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून थेट हॉटेल व्यवसाय संकटात आला. अनेक हॉटेल चालकांनी व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने थेट हॉटेल बंद ठेवली आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबायला हवे, अशी मागणी केली जात आहे. या युद्धाचा परिणाम फक्त दोन किंवा तीन देशांपुरता आता मर्यादित राहिला नाही. युद्धादरम्यान अमेरिकेकडून अनेक मोठे दावे केले जात आहेत. यादरम्यान आता खळबळजनक दावा अमेरिकेने केला, ज्यानंतर जगाची झोप उडाली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले की, अमेरिकन सैन्याने इराणच्या महत्त्वाच्या खार्ग बेटावर सर्वात शक्तिशाली हवाई हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणी लष्कर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तेलाच्या पायाभूत सुविधांना कोणताही धोका नाही, असेही अमेरिकेने म्हटले. होर्मुज मार्ग इराणने खुला करावा, अन्यथा अत्यंत वाईट परिणाम इराणला भोगावा लागेल असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, अमेरिन सैन्याने मध्य पूर्वच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली हवाई हल्ला केला. ज्यामुळे इराणचे खार्ग बेटावरील लष्कर पूर्णपणे नष्ट झाले. मी बेटावरील पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली.

आता या हल्ल्याला इराण नक्की कसे उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कोणत्याही क्षणी इराणकडून युद्धात पराभव पत्कारला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे. मात्र, इराणने स्पष्ट सांगितले की, फक्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून युद्ध जिंकता येत नाही. अमेरिकेने केलेल्या चुकीच्या त्यांना जोपर्यंत पश्चाताप होणार नाही, तोपर्यंत इराण लढेल.

Follow Us