तीन तेरा वाजलेच, डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणबद्दल मोठे विधान, युद्धविराम करार तर दूरच पण..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. लवकरच दोन्ही देशातील युद्ध संपेल असे सांगितले जात होते. त्यावेळी अमेरिकेकडून अत्यंत मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्यामध्ये आता इराणने केलेल्या भाष्याने जगाचे टेन्शन वाढले.

तीन तेरा वाजलेच, डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणबद्दल मोठे विधान, युद्धविराम करार तर दूरच पण..
US President Donald Trump
| Updated on: May 26, 2026 | 9:28 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा एकदा मोठी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच म्हटले होते की, इराण आणि अमेरिका युद्धविरामाच्या अत्यंत जवळ आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांनी इराणला धमकी दिली. इराण आणि अमेरिका युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अनेक देशात महागाई वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबायले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, तणाव कमी होण्यापेक्षा अधिक वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणच्या संवर्धित युरेनियमसंदर्भात एक महत्त्वाचे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हे आण्विक साहित्य  एकतर वाहतूक आणि संपूर्ण विनाशासाठी तात्काळ अमेरिकेकडे सुपूर्द केले जावे, किंवा त्याहूनही चांगला पर्याय म्हणजे इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाच्या सहकार्याने थेटपणे ते ज्या जागेवर आहे तिथेच नष्ट करावे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत लिहिले की, या प्रक्रियेवर अणुऊर्जा आयोग किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थेसारख्या अणुऊर्जा संस्थेद्वारे लक्ष ठेवले जाईल. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी. कारण त्यानंतर जेणेकरून जगाला खात्री पटेल की, या आण्विक सामग्रीचा वापर शस्त्रांसाठी केला जाणार नाही. मात्र, याकरिता इराण तयार नाही.

याच मुद्द्यावर पूर्ण खोडे अडले आहे. अमेरिकेसोबत लवकर कोणताही करार करणे शक्य नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. अमेरिकेसोबतच्या चर्चेत प्रगती झाली असली तरी, लगेचच करार होण्याची शक्यता नाही, असे इराणने म्हटले. ज्यामुळे पुन्हा एकदा आता जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने दुसऱ्या देशांमध्ये तीनतेरा वाजले आहेत.

इराण आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे जग संकटात आहे. मात्र, दोन्ही देश अडून बसली आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच करार अंतिम होऊ शकतो, असा दावा केल्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकी यांनी थेट लगेचच करार होणे शक्य नसल्याचे म्हटले.

Follow Us