
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढत असून इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, आम्ही अजून सहा महिने आरामात युद्ध लढू शकतो. ब्रिटन या युद्धात अमेरिकेच्या मदतीला धावून आला. मात्र, अमेरिकेने ब्रिटनची मदत नाकारली असून अमेरिकेने हे युद्ध जवळपास जिंकल्याचा मोठा दावा अमेरिकेने केला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून गॅसची टंचाई देखील जाणवत आहे. दोन्ही बाजूंनी मोठे हल्ले झाले. इस्त्रायलवर घातक बॉम्ब हल्ले इराणकडून केले जात आहेत. या युद्धाचा मोठा फटका दुबईला बसत आहे. इराणला मदत करू नका असा थेट मेसेज अमेरिकेने रशियाला दिला आहे. गुप्त डेटा रशियाकडून इराणला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पुतिन यांना थेट मेसेज अमेरिकेने दिला आहे. रशियाकडून इराणला सिक्रेट डेटा पुरवण्यात आल्याचा गाैप्यस्फोट अमेरिकेने केल्याने खळबळ उडाली. मात्र, हा डाटा नक्की काय होता, याबाबत काही माहिती मिळू शकली नाही.
अमेरिका इराण युद्ध दुसऱ्या टप्प्यात आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अमेरिकन सैन्य जमिनीवर उतरून इराणवर हल्ला करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांसोबत आणि रिपब्लिकन नेत्यांसोबत जमिनीवर आक्रमण करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली आहे. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन सैन्याला नुकसान पोहोचण्याचे संकेत आहेत.
इराणने जॉर्डनमधील $300 दशलक्ष किमतीची THAAD हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली, ज्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले. इस्रायलने 16 इराणी लढाऊ विमाने नष्ट केल्याचा दावा केला. इराणच्या टार्गेटवर दुबईचे विमानतळ आहे. ड्रोन हल्ल्यामुळे दुबई विमानतळावरील धावपट्टीचे नुकसान झाले. ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकन नौदलाने आतापर्यंत 42 इराणी जहाजे बुडवली आहेत.
इराण अमेरिका आणि इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देत आहे. त्यामध्येच अमेरिकेचे सैन्य आता थेट इराणमध्ये उतरणार असल्याने मोठी खळबळ उडाली. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.