मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी खाल्ले युक्रेन-रशियाच्या युद्धात मेलेल्याच्या टाळूवरील लोणी, तब्बल ₹1,30,56,36,07,50,000 रूपयांची कमाई

डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या फायद्यासाठी सर्वकाही करतात. फायद्यासमोर जगातील कोणताही मित्र त्यांचा शत्रू बनतो. भारतावर टॅरिफ लागून त्यांनी हे दाखवून दिले. हेच नाही तर त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या युद्धातून मोठा फायदा करून घेतलाय. यामुळेच ते या युद्धात मध्यस्थी करताना दिसत आहेत. आता अत्यंत मोठा खुलासा झालाय.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी खाल्ले युक्रेन-रशियाच्या युद्धात मेलेल्याच्या टाळूवरील लोणी, तब्बल ₹1,30,56,36,07,50,000 रूपयांची कमाई
Donald Trump Ukraine Russia war
| Updated on: Aug 19, 2025 | 5:36 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी करतात. ज्यावेळी भारताची गरज होती, त्यावेळी भारत आमचा मित्र असल्याचे सांगत. आता मात्र, टॅरिफच्या विषय आला, त्यावेळी त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावले. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांची त्यांनी थेट अडवणूक केली. डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही देशासोबत ज्यावेळी जवळीकता करतात, त्यावेळी काहीतरी त्यांचा फायदा असतो. व्यापार कराराशिवाय ते एखाद्या मुद्द्यावर बोलत नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनकडून फायदा दिसत असल्यानेच ते रशिया आणि युक्रेनच्या मुद्द्यामध्ये पडले आहेत. युक्रेन सरकारने वॉशिंग्टन बैठकीपूर्वीच मोठ्या कराराची ब्लूप्रिंट तयार केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. युक्रेनने मोठा प्रस्तावच तयार केला आहे. जे अमेरिकेच्या संरक्षण उद्योगासाठी अत्यंत फायदेशीर आणि फायदा देणारे आहे. फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टमध्ये याबद्दल सांगण्यात आलंय.

युक्रेनने अमेरिकेला ₹ 1,30,66,03,32,00,000 किंमतीची शस्त्रे आणि ड्रोन खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. जे अमेरिकेसाठी अत्यंत फायदाचा करार आहे. याच्या बदल्यात त्यांना फक्त त्यांच्या सुरक्षेची हमी पाहिजे आहे. युक्रेनने अमेरिकेकडून 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,706,850,000,000 रुपये किंमतीचे शस्त्र खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुळात म्हणजे गेम असा आहे की, या खरेदीचा आर्थिक भार युरोपियन मित्र राष्ट्रांना उचलावा लागणार आहे.

युक्रेनला यामध्ये फक्त त्यांच्या सुरक्षेची हवी आहे. जी शांततापूर्ण त्यांना हवी आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर दोन्ही बाजूंनी अमेरिकेचा फायदाच फायदा आहे. या करारामुळे अमेरिकन उद्योगांना फायदा होईलच शिवाय  संरक्षण आघाडीमध्ये त्यांची भूमिका मजबूत होईल. रशिया आणि युक्रेनचे युद्ध संपवण्यामागे अमेरिकेचा हा मोठा कट असल्यानेच डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध संपवण्यामध्ये रस आहे. पूर्ण जगाला माहिती आहे की, रशियाच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनला मदत कोण करत होते. मात्र, या युद्धानंतर युक्रेनच्या हाती काही लागणार नसल्याचे अगदी स्पष्टच आहे.