
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. त्यामध्येच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जग संकटात आलंय. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. अमेरिका आणि इराणच्या संघर्षात आता तेहरानने थेट इशारा दिला. तेहरानने अमेरिकेला म्हटले की, आमची बोटे ट्रिगरवर आहेत. अमेरिकेची सर्वात घातक युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन थेट इराणच्या जवळ पोहोचली आहे. अमेरिकन नौदलाच्या ताफ्याचे इराणजवळ आगमन झाले, यामुळे युद्धाची पूर्ण स्थिती निर्माण झाली. अमेरिकेच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे, हे कोणालाही कळत नाही. इराणने अगोदरच इशारा देत म्हटले की, आमच्यावर हल्ला केला तर आम्ही संपूर्ण जग नष्ट करू. फक्त इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला की, अमेरिका इराणवर हल्ला करणार याबद्दल कळू शकले नाही. अमेरिकेची ही युद्धनौका एका स्ट्राइक ग्रुपसोबत कार्यरत असते, ज्यामध्ये गाईडेड मिसाईल क्रूझर्स, डिस्ट्रॉयर्स, पाणबुड्या आणि इतर जहाजांचा समावेश आहे.
यूएसएस अब्राहम लिंकन ही जगातील सर्वात मोठी फिरती युद्धनौका मानली जाते. ही युद्धनौका अमेरिकेची काही सर्वात घातक लढाऊ विमाने वाहून नेते. या युद्धनाैकेसमोर इराणचे लढाऊ विमाने टिकणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. ही सर्वात घातक युद्धनाैका आहे. हीच युद्धनाैका आता अमेरिकेने इराणच्या जवळ आणून ठेवली आहे. मुळात म्हणजे अमेरिकेकडे असे 5 मोठे हत्यार आहेत, जे इराणकडे नाहीत.
इस्त्रायलसोबतच्या युद्धादरम्यान अमेरिकेने इराणचे अणुबॉम्ब उद्धवस्थ केली होती. इराणच्या लष्कराची हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार अमेरिकन बी 2 बॉम्बरला शोधण्यात अयशस्वी ठरले. बी 2 बॉम्बरचा सामना करणे हे इराणसाठी केवळ कठीणच नाही, तर जवळजवळ अशक्य आहे. यामुळे आता इराण संकटात सापडल्याचे बघायला स्पष्ट दिसत आहे. मात्र, इराण असूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही बघायला मिळत आहे.
अमेरिका त्यांच्या धोकादायक ड्रोनचा वापर इराणी लष्करी तळांवर मोठ्या हल्ल्यांसाठी करू शकतो; हे ड्रोन 27 ते 42 तास उड्डाण करू शकतात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे युद्ध भडकण्याचे मोठे संकेत नक्कीच आहेत. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सतत इराणला इशारा देताना दिसत आहेत. मात्र, इराण सरकारही ठाम भूमिकेवर असल्याचे बघायला मिळतंय.