ट्रम्प यांचे अनेक निकटवर्तीयही ‘अंडरग्राउंड’! अमेरिकेचे अर्थमंत्री घर सोडून गेले लष्करी तळावर आश्रयाला; नेमकं काय घडलं?

वृत्तानुसार, इराणकडून जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर अमेरिकेचे अर्थमंत्री आपले घर सोडून लष्करी तळावर आश्रयाला जावे लागले आहे. नेमकं काय घडलं आहे हे जाणून घेऊयात...

ट्रम्प यांचे अनेक निकटवर्तीयही अंडरग्राउंड! अमेरिकेचे अर्थमंत्री घर सोडून गेले लष्करी तळावर आश्रयाला; नेमकं काय घडलं?
chief bessent
Image Credit source: chief bessent
| Updated on: Nov 11, 2026 | 9:05 AM

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांना इराणकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर अमेरिकेचे अर्थमंत्री यांनी अलीकडेच आपले घर सोडले असून ते एका लष्करी तळावर स्थलांतरित झाले आहेत.’द न्यूयॉर्क टाइम्स’ने मंगळवारी या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या आताच्या आणि माजी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात असल्याचे समोर आले आहे. स्कॉट बेसेंट यांच्याविरुद्ध देण्यात आलेल्या धमक्यांशी संबंधित माहितीवरून ही बाब समोर आली आहे. ज्या व्यक्तींनी ही माहिती दिली, त्यांनी आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. खरतर ऑगस्ट महिन्यापासून,ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट इराणवर आर्थिक दबाव वाढवण्याचे काम करत आहेत. कठोर निर्बंध आणि व्यापारविषयक बंधने लादून इराणला एकाकी पाडणे हा त्यांचा उद्देश आहे असे दिसून येते. आता याच कारणामुळे, इराणने इतर अधिकाऱ्यांसोबत त्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने, गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात रॉयटर्सद्वारे पाहिल्या गेलेल्या एका निवेदनात असा इशारा दिला आहे की, इराणने अमेरिकन कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे अधिक प्रयत्न केले आहेत. तेहरानद्वारे अमेरिकन नागरिकांविरुद्ध आखले जाणारे धोकादायक कट आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचले आहेत.

Loading...

स्कॉट बेसेन्ट घाबरणार नाही?

एका अहवालानुसार, ट्रेझरी विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणी राजवटीच्या धमक्यांमुळे मिस्टर बेसेन्ट घाबरणार नाहीत. याशिवाय त्यांनी असेलही पुढे सांगितले की, इराणच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आणण्याची मोहीम सुरू ठेवण्याबाबत ते अजूनही प्रतिबद्ध आहेत.

फक्त मिस्टर बेसेन्ट नाहीत यादीत अनेक अधिकारी

वॉशिंग्टन परिसरातील आपली घरे सोडून लष्करी तळावर किंवा इतर सुरक्षित ठिकाणी अनेक लोक स्थलांतर झाले आहेत. ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यादीत आता मिस्टर बेसेन्ट यांचेही नाव जोडले गेले आहे. गेल्या वर्षी किमान सहा अधिकाऱ्यांनी असेच पाऊल उचलले होते. या सहा अधिकाऱ्यांमध्ये सध्या व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ असलेले स्टीफन मिलर आणि त्या वेळी ॲटर्नी जनरल असलेल्या पाम बाँडी यांचा समावेश होता.

इराणविरुद्धच्या आर्थिक युद्धाचा महत्त्वाचा चेहरा मिस्टर बेसेन्ट

२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल संघर्षामध्ये, तेहरानवर आर्थिक दबाव आणण्याच्या वॉशिंग्टनच्या मोहिमेत बेसेन्ट एक महत्त्वाचा चेहरा राहिला आहे. या संघर्षकाळात, इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे आणि लेबनॉनवर इस्रायलने केलेल्या आक्रमणांमुळे हजारो लोक मारले गेले आहेत. याशिवाय तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या अमेरिका-इस्रायल कारवायांमध्ये इराणचे अनेक उच्चपदस्थ अधिकारीही मारले गेले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us