Drone attack on US base | बदला घेणार, महाशक्ती खवळली, कुठल्याही क्षणी ‘या’ देशावर मोठा हल्ला

US troops killed in Jordan | महाशक्ती अमेरिका खवळली आहे. कारण इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकन सैन्यावर झालेला हा आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेत प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे अमेरिकेचा हल्ला कसा, कधी आणि कुठे होईल? या बद्दल आता काहीच सांगता येणार नाही.

Drone attack on US base | बदला घेणार, महाशक्ती खवळली, कुठल्याही क्षणी या देशावर मोठा हल्ला
Airstrike
| Updated on: Jan 29, 2024 | 1:09 PM

US troops killed in Jordan | जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. सीरीयाच्या सीमेजवळ अमेरिकेचा हा तळ आहे. या ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत. 10 पेक्षा जास्त सैनिक जखमी झालेत. ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकन सैन्यावर झालेला हा आतापर्यंतच सर्वात मोठा हल्ला आहे. कारण यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर अमेरिकन सैन्य तळावर हल्ला झाल्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिलं जातं. यावेळी अमेरिकेचे सैनिक मारले गेलेत, त्यामुळेच अमेरिकेच प्रत्युत्तरही तितकच मोठ असणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बदला घेण्याचा संकल्प बोलून दाखवलाय. ज्यो बायडेन यांनी या हल्ल्यासाठी इराणच समर्थन प्राप्त असलेल्या दहशतवादी गटाला जबाबदार धरल आहे.

“आम्ही वेळ आणि ठिकाण ठरवून हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवू” असं अमेरिकेने म्हटलं आहे. आता अमेरिकेच्या स्ट्राइकची जागा काय असेल? या बद्दल कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. अमेरिका थेट इराणमध्येही घुसूनही स्ट्राइक करु शकते. असं झाल्यास मध्य आशियात तणाव आणखी वाढेल. इराणने या हल्ल्याशी आपला संबंध फेटाळला आहे. आमचा काहीही संबंध नाही, असा इराणने दावा केलाय. ‘आमच्यावरील आरोप आधारहीन आहेत’ असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कान्नानी यांनी सांगितलं.

‘एअर स्ट्राइकचा काहीही फायदा झालेला नाही’

‘ज्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय, ते आमच्याकडून आदेश घेत नाहीत’ असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर रिपब्लिकन सिनेटर्सनी बायडेन प्रशासनाची निंदा केली आहे. जराही विलंब न लावता अधिक मजबुतीने लष्करी उत्तर देण्याची गरज आहे, असं सिनेटर्सच मत आहे. “इराणच समर्थन प्राप्त असलेल्या दहशतवादी गटांवर एअर स्ट्राइकचा काहीही फायदा झालेला नाही, हे पॉलिसीच अपयश आहे” असं अमेरिकन सिनेटर्सनी म्हटलय.

त्या विरोधात अमेरिकेची ही Action

अमेरिकेने अलीकडेच येमेनमध्ये घुसूनही हौथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले होते. लाल सागरात हौथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केलं जातय. त्या विरोधात अमेरिकेने ही Action घेतली. अमेरिकेने ठरवलं, तर युद्धाचा भडका आणखी वाढू शकतो.