डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला कट, या 3 देशांचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या निशाण्यावर, कधीही होऊ शकते हत्या

Doland Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 देशांच्या राष्ट्रपतींना मारण्याची धमकी दिली आहे. हे तिन्ही देश अमेरिकेचे शत्रु मानले जातात. आगामी काळात या राष्ट्राध्यक्षांची हत्या होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला कट, या 3  देशांचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या निशाण्यावर, कधीही होऊ शकते हत्या
Donald Trump
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 24, 2025 | 3:54 PM

गेल्या काही महिन्यांमध्ये जगातील अनेक देशांमधील तणाव वाढला आहे. अनेक देशांनी एकमेकांवर हल्लेही केले आहेत. अनेक देश अमेरिकेच्या रडारवर आहेत. अशातच आता तीन देशांचे सर्वोच्च नेते किंवा राष्ट्रपती अमेरिकेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः तिन्ही राष्ट्रपतींना मारण्याची धमकी देत ​​आहेत. या देशांमध्ये कोलंबिया, व्हेनेझुएला आणि इराण या देशांचा समावेश आहे. हे तिन्ही देश अमेरिकेचे शत्रु मानले जातात. व्हेनेझुएला आणि कोलंबिया हे अमेरिकेच्या शेजारील देश आहेत. तर इराण हा मध्य आशियातील देश आहे. अमेरिका या तिन्ही देशांमध्ये त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या नेत्यांना सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्याच्या राष्ट्रपतींची हत्या केला जाण्याची शक्यता आहे.

हे तीन देश अमेरिकेचे शत्रू का आहेत?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबिया आणि व्हेनेझुएलावर कोकेन आणि ड्रग्ज तस्करीचा आरोप केला आहे. हे दोन्ही देश अमेरिकेत ड्रग्जची तस्करी करत आहेत असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प यांची नजर व्हेनेझुएलाच्या तेलावर असल्याचेही बोलले जात आहे. अणु प्रकल्पावरून अमेरिका इराणवर नाराज आहे. मात्र अमेरिका थेट इराणवर हल्ला करणार नाही. ते इस्रायलच्या मदतीने इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. इराणने अणुप्रकल्प थांबवावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. ट्रम्पने याबाबत अल्टिमेटम देखील जारी केला आहे.

कोणते राष्ट्राध्यक्ष अनेरिकेच्या निशाण्यावर ?

निकोलस मादुरो – डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, ‘मला मादुरो यांनी व्हेनेझुएला सोडावे असे वाटते. अन्यथा, त्यांचे काहीही होऊ शकते. मादुरो यांनी जीव वाटवणाच्या तोच एक सर्वोत्तम पर्याय आहे.’ ट्रम्प यांच्या विधानानंतर मादुरो यांनी क्यूबन एजंट्सना त्यांची सुरक्षा सोपवली आहे. मादुरो म्हणाले की, अमेरिका मला मारून व्हेनेझुएलाच्या तेलावर कब्जा करण्याच्या तयारीत आहे.

मसूद पेझेश्कियान – इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यावरही अमेरिकेची नजर आहे. जूनमध्ये इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यावेळी पेझेश्कियान यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र ते बचावले होते. धमकी मिळूनही इराणने असे म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत अणुप्रकल्प थांबवणार नाही.

गुस्तावो पेट्रो – डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘पेट्रो यांनी आपला जीव कसा वाचवायचा याची काळजी करावी. पेट्रो जे करत आहे ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही कठोर कारवाई करू.’