AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Epstein Files: मोठी खळबळ! एपस्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, अजून काय काय खुलासे

Epstein Files Donald Trump: अमेरिकेच्या न्याय विभागाने मंगळवारी रात्री लैंगिक छळाप्रकरणी जेफ्री एपस्टीनशी संबंधीत जवळपास 30 हजार पानांचा दस्तावेज जारी केला. नवीन फाईल्समध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अजून काय काय खुलासे या फाईल्समधून समोर आले ते जाणून घेऊयात...

Epstein Files: मोठी खळबळ! एपस्टीन फाईल्समध्ये ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, अजून काय काय खुलासे
एपस्टीन फाईल्स, डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Dec 24, 2025 | 11:37 AM
Share

America President Donald Trump Big Allegation: अमेरिकेतील कुख्यात एपस्टीन फाईल्समध्ये एक मोठा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी रात्री या प्रकरणाशी संबंधीत जवळपास 30 हजार पानांचा दस्तावेज जाहीर केले. या फाईलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या जुन्या संबंधाचे फोटो, खासगी यात्रेतील फोटो आणि इतर अनेक दस्तावेज समोर आले आहेत. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन आणि इतर अनेक प्रभावशाली व्यक्तींचे फोटो बाहेर आले आहेत. पण ट्रम्प यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

एपस्टीनच्या खासगी जेटमध्ये ट्रम्प यांची भरारी

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सार्वजनिक स्तरावर एपस्टीनसोबत मैत्री तुटल्याचे जाहीर केलेल आहे. तर एपस्टीनसोबत आपण कधीही विमान प्रवास केला नसल्याचा दावा केला. पण नवीन फ्लाईट लॉग्स इनमध्ये दोघांनी एकत्रित प्रवास केल्याचे समोर आले आहे. फाईल्समधील जानेवारी 2020 मध्ये एक ईमेल समोर आला आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 ते 1996 या काळात एपस्टीन सोबत जवळपास 8 वेळा खासगी यात्रा केली आहे. या खासगी प्रवासात एपस्टीन, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची त्यावेळची पत्नी मार्ला मॅपल्स, त्यांची मुलंही सोबत असल्याचे समोर आलेले आहे. या फाईल्समध्ये ट्रम्प यांनी काही गुन्हा केल्याचे मात्र नमूद नाही.

एका अनोळखी सुंदर तरुणीसोबत ट्रम्प

या एपस्टीन फाईल्सनुसार, या हवाई प्रवासात, विमान प्रवासात चार वेला एपस्टीन याचा साथीदार गिस्लीन मॅक्सवेल हा सोबत होता. त्याला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि ह्युमन ट्रॅफिंग, सेक्स ट्रॅफिकिंग या कारणासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. 1993 मधील एका विमान प्रवासात एपस्टीन, ट्रम्प आणि एक 20 वर्षीय सुंदर तरुणीसोबत दिसले. या तरुणीची ओळख लपविण्यात आली आहे. तर इतर विमान प्रवासात इतर महिलांचा पण समावेश दिसतो. या तरुणी सेक्स ट्रॅफिकिंगसंबधीत असल्याचे समोर येत आहे.

FBI च्या फाईल्समध्ये बलात्काराचा आरोप

एपस्टीन फाईल्समध्ये FBI च्या फाईल्सच्या आधारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर 2020 मधील ही फाईल असल्याचे म्हटले जाते. त्यामध्ये एका महिलेने हा आरोप केला आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या फाईलमध्ये लिमोजीन चालकाचाही उल्लेख आहे. 1995 मध्ये त्याने एका कॉलवरील संवाद ऐकला होता. त्यात ट्रम्प हे एका मुलीसोबत आपण कसं वागलो याचा खुलासा करत असल्याचा दावा त्याने केला होता. पण ज्या मुलीसोबत हे कृत्यं झालं. तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणात तपास अद्याप बाकी असल्याचे एफबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे बलात्काराच्या आरोपावर कोणताही खुलासा देण्यास एफबीआयने नकार दिला आहे. पण या ताज्या घटनाक्रमामुळे ट्रम्प हे चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसते.

ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.