Putin On US : भारतात आलेल्या पुतिन यांचा ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न, अमेरिकेचा बुरखा टराटर फाडला

Putin On US : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अमेरिकेचा दुटप्पी चेहरा उघड केला. "आमचं लक्ष्य आपल्या आपल्या हितावर आहे. भारत आणि रशियाच्या हिताचं रक्षण हे आमचं उद्दिष्टय आहे" असं पुतिन म्हणाले.

Putin On US : भारतात आलेल्या पुतिन यांचा ट्रम्पना निरुत्तर करणारा एकच प्रश्न, अमेरिकेचा बुरखा टराटर फाडला
Putin-Modi
Updated on: Dec 05, 2025 | 9:06 AM

भारत दौऱ्यावर आलेले रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकी धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करु नये म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. जेणेकरुन भारतीय साहित्याची अमेरिकेला होणारी निर्यात कमी होईल, त्याचा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला पाहिजे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून रशियाला युक्रेन विरुद्ध युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळतं, असा ट्रम्प यांचा दावा आहे. आता भारतात आलेले रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड करत त्यांचा बुरखा फाडला आहे. पुतिन म्हणाले, जर अमेरिका रशियन तेल खरेदी करु शकते, मग भारत का नाही?. “अमेरिका त्यांच्या न्यूक्लियर पावर प्लांट्ससाठी आमच्याकडून न्यूक्लियर फ्यूल विकत घेते. ते सुद्धा इंधनच आहे, एनर्जी आहे” असं पुतिन इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

“जर, अमेरिकेला आमच्याकडून इंधन विकत घेण्याचा अधिकार आहे, मग भारताला त्यांच्या अधिकारापासून का वंचित ठेवायचं?. हा खूप बारकाईने अभ्यास करण्याचा मुद्दा आहे. आम्ही राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत या मुद्यावर चर्चा करायला तयार आहोत” असं पुतिन म्हणाले. प्रतिबंधांमुळे भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, “या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यादरम्यान व्यापारात काही घसरण झाली आहे. पण आमचा व्यापार आधीसारखाच आहे”

भारतापासून कोणाला प्रॉब्लेम?

“जागतिक बाजारात भारताच्या वाढत्या ताकदीमुळे जगातील काही शक्ती बेचेन आहेत. रशियन तेल खरेदीवरुन पाश्चिमात्य देशांच्या चिंता, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताविरोधातील टॅरिफचा निर्णय यातून भारताच्या वाढत्या आर्थिक प्रभावाबद्दलची चिंता दिसते” असं पुतिन म्हणाले. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेबद्दलही पुतिन यांचा विचारण्यात आलं. ते म्हणाले की, “काही बाहेरील शक्तींचा दबाव असूनही मी किंवा पंतप्रधान मोदींनी कोणाविरोधात काम करण्यासाठी आमच्या भागीदाराची वापर केलेला नाही”

ट्रम्प यांचा अजेंडा काय?

“अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आपला अजेंडा आहे. त्यांची स्वत:ची टार्गेट्स आहेत. आमचं लक्ष स्वत:वर आहे. आम्ही कोणाविरोधात नाही. आमचं लक्ष्य आपल्या आपल्या हितावर आहे. भारत आणि रशियाच्या हिताचं रक्षण हे आमचं उद्दिष्टय आहे” असं पुतिन म्हणाले.