AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अत्यंत मोठे गिफ्ट, थेट विमानतळावरच..

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचे स्वागत केले. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. विमानतळावरील स्वागताचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अत्यंत मोठे गिफ्ट, थेट विमानतळावरच..
Vladimir Putin and Narendra Modi
| Updated on: Dec 05, 2025 | 7:57 AM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचे भारतात आगमन झाले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. खास पद्धतीने पुतिन यांचे स्वागत करण्यात आले. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याचे खास नियोजन करण्यात आलंय. प्रत्येक बारीक गोष्टीचे लक्ष ठेवण्यात आले. फक्त पुतिन हेच नाही तर त्यांच्यासोबत रशियाचे तब्बल सात मंत्री भारताच्या दाैऱ्यावर आहेत. रात्री नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी एकत्र डिनर केले. काही मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. भारत आणि रशियात काही महत्वाचे करार होणार आहे. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. अमेरिका भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी मोठा दबाव टाकत आहे. त्यामध्येच पुतिन थेट भारत दाैऱ्यावर पोहोचले आहेत.

युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. चार वर्षांनंतर पुतिन अशावेळी भारत दाैऱ्यावर आहेत, ज्यावेळी भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध एका वाईट वळणावर आहेत. भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. 2021 मध्ये यापूर्वी पुतिन भारत दाैऱ्यावर आले होते.

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची भेट 2024 मध्ये मॉस्कोमध्ये झाली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा शेवटचा भारत दौरा 6 डिसेंबर 2021 रोजी होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन विमानतळावर दाखल होताच नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना मोठे गिफ्ट देत त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेटवस्तू म्हणून रशियन भाषेत लिहिलेली भगवतगीता दिली. पुतिन यांनीही मोदींचे हे गिफ्ट आनंदाने स्विकारले.

काळा सूट आणि बूट घातलेले पुतिन विमानातून बाहेर पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आश्चर्यचकित केले आणि मोठे सरप्राईज दिले. पंतप्रधान मोदी यांनी प्रोटोकॉल तोडून त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. नरेंद्र मोदी यांना बघताच पुतिन यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. हेच नाही तर विमानतळावर दाखल होताच दोघांनीही आनंदाने एकमेकांची गळाभेट घेतली. काही दिवसांपूर्वीच पुतिन आणि नरेंद्र मोदी यांची भेट चीनमध्येही झाली होती. दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला होता.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना