
पृथ्वी पलीकडचं विश्व म्हणजे अवकाश. या अवकाशाचं मानवी मनाला नेहमीच कुतूहल वाटत आलय. अवकाशात पृथ्वीसारखं वातावरण नाहीय. तिथे माणूस राहू शकतो का? अवकाशात माणूस का तरंगतो? असे अनेक प्रश्न मानवी मनला पडतात. गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका, रशिया, चीन, भारत तसच इतर देश अविरतपणे अवकाश संशोधनाच कार्य सुरु आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा या रिसर्चमध्ये आघाडीवर आहे. मागच्या काही वर्षातील संशोधनातून अवकाशातील बरीच रहस्य उलगडली आहेत. पण अजूनही हा शोध संपलेला नाहीत. अवकाशातील सर्व रहस्य समजली, असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कारण अवकाशाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, दरवर्षी अवकाशासंबंधी काही ना काही नवीन माहित समोर येत असते. अवकाश संशोधन हा फक्त आता शोधापुरता मर्यादीत राहिलेला विषय नाही. अवकाश संशोधन क्षेत्रात आता स्पर्धा सुरु झाली आहे. अवकाश संशोधन हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. सर्वात पहिलं कोण पोहोचणार? किंवा कुठला देश अवकाशातील नवीन गोष्ट शोधून काढणार? याची स्पर्धा लागली आहे. नेहमीच वेगवेगळ्या देशांची अवकाश मिशन्स सुरु असतात. अवकाशाचा विषय पुन्हा चर्चेत...