कोरोना लसीकरणानंतर फिरायला जायचा प्लान करताय? पासपोर्टसोबत ‘हे’ सर्टिफिकेट दाखवावं लागू शकतं

| Updated on: Jan 06, 2021 | 1:57 PM

आता वर्ष 2021 ची सुरुवात झाली आहे. त्यासोबतच लोकांनी फिरायला जाण्याचाही प्लान बनवण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना लसीकरणानंतर फिरायला जायचा प्लान करताय? पासपोर्टसोबत हे सर्टिफिकेट दाखवावं लागू शकतं
Follow us on

मुंबई : अनेक देशांमध्ये कोरोना विषाणुच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे (What Will Be Required For Travel). भारतातही येत्या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2020 मध्ये जेव्हा कोरोना लशीबाबत लोकांना कळालं. त्यानंतर बहुतेकांनी फिरायला जाण्याचा प्लान आखला (What Will Be Required For Travel).

वर्ष 2020 हे सर्वांसाठीच अत्यंत निराशाजनक ठरलं. गेले अनेक महिने लॉकडाऊनमुळे सर्वच घरात कैद झाले होते. आता वर्ष 2021 ची सुरुवात झाली आहे. त्यासोबतच लोकांनी फिरायला जाण्याचाही प्लान बनवण्यास सुरुवात केली आहे. पण आता कोरोनानंतर विदेश यात्रा तितकी सोपी राहिलेली नाहीय जर तुम्हाला कुठल्या विदेशी ठिकाणी सुट्टी घालवायला जायचं असेल तर तुम्हाला यंदा पासपोर्टसोबतच अनेक गोष्टींची गरज असणार आहे.

लसीकरणाचं सर्टिफिकेट

ट्रॅव्हल सर्च इंजिन स्कायस्कॅनरच्या माहितीनुसार, लशीची गुड न्यूज आल्यानंतर अचानक ट्रॅफीक वाढलं आहे. तर, ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी एअरलाईन कंपनी कंतासने हे स्पष्ट केलं की, यात्रा करणाऱ्या लोकांकडे या गोष्टीचा पुरावा असालयला हवा की त्यांनी कोव्हिड-19 ची लस घेतली आहे. त्यानंतरच ते आंतराष्ट्रीय यात्रेसाठी योग्य मानले जातील.

पण, आद्याप इतर कुठल्याही एअरलाईनकडून याबाबत कुठली घोषणा करण्यात आलेली नाही.
एयरपोर्ट्स काउंसिल इंटरनॅशनलकडूनही (एसीआई) अशी कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही ज्याअंतर्गत कोरोना व्हॅक्सिनला आवश्यक म्हटल्या गेलं असेल.

डिजीटल हेल्थ पासपोर्ट

काही ठिकाणी तुम्हाला फिरायला जाण्यासाठी कोरोना चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. पण, अद्याप कुठल्या देशाने याची घोषणा केलेली नाही. फिरण्यासाठी लशीचा अहवाल देणं हे काही नवीन नाही. येलो फीव्हरची साथ होती तेव्हा देखील काही देशांनी लशीचा अहवाल दाखवणं अनिवार्य केलं होतं.

यात्रेसाठी डिजीटल पासपोर्ट लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करु शकतो. डिजीटल हेल्थ पासपोर्टच्या माध्यमातून यात्रेकरु लसीकरणाच्या पुपराव्याला अपलोड करु शकतील. याला कॉमनपास अॅप म्हणून ओळखलं जाईल. यावर कुणीही त्यांचा कोरोना चाचणी अहवाल सुरक्षित पद्धतीने आपल्याजवळ ठेवू शकता.

लसीकरणाचा रिकॉर्ड

कॉमनपासला इंटरनेशनल स्‍टॅण्डर्डनुसार डिझाईन करण्यात आलं आहे. यावर लॅबचे रिझल्ट ते लसीकरणाचा रिकॉर्डपर्यंत सर्व सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. सोबतच हा एअरलाईन्स बॉर्डर कंट्रोल्‍स आणि सरकारसाठीही उपलब्ध करता येईल. यावर असलेल्या पर्सनलाइज्‍ड क्‍यूआर कोडच्या माध्यमातून यात्रेकरुची आरोग्याची माहिती उपलब्ध असेल (What Will Be Required For Travel).

वर्ल्‍ड इकोनॉमिक फोरम आणि जिनिवा येथील एनजीओ कॉमन प्रोजेक्‍ट्सकडून अनेक एयरलाईन्ससोबत या कॉमन पाससाठी भागीदारी केली आहे. ज्या एअरलाईन्ससोबत या मोबाईल अॅपची भागीदारी झाली आहे त्यामध्ये कॅथे पॅसेफिक, जेट ब्‍ल्यू, लुफ्थांसा, स्विस एयरलाईन्स, युनायटेड एयरलाईन्स आणि व्हर्जिन अटलांटिक यांचा समावेश आहे.

What Will Be Required For Travel

संबंधित बातम्या :

Disease X: कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस; काँगोतील महिलेला रहस्यमयी रोगाची लागण

Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू, फिनलँड-बुल्गेरियामध्ये साईड इफेक्ट्सची प्रकरणं

इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, बोरिस जॉन्सन यांची घोषणा