US Fighter Jets : अमेरिका इतक्यांदा ऑफर देतो, पण भारत त्यांच्याकडून कधीच फायटर विमानं का विकत घेत नाही? कारण काय?
US Fighter Jets : भारताने अमेरिकन बनावटीची फायटर विमानं विकत घ्यावी म्हणून बोईंग, लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपन्यांकडून बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. ते लॉबिंग करतायत. पण भारताने आतापर्यंत कधीच त्यांची ऑफर स्वीकारलेली नाही. इंडियन एअर फोर्सने नेहमीच अमेरिकन लढाऊ विमानांना का नकार दिलाय? त्यामागे काय कारणं आहेत? समजून घ्या.

अमेरिका आणि भारतामध्ये फक्त व्यापारी संबंध नाहीत, तर रणनितीक संबंध आहेत. बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळापासून भारत-अमेरिका संबंध सुधारायला सुरुवात झाली. आता हे संबंध इतके घनिष्ठ झालेत की, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचा काही प्रमाणात प्रभाव आपल्याला मान्य करावा लागतो. उदहारणार्थ रशियन तेल खरेदी बंद करावी लागली. त्यानंतर टॅरिफ कमी झाला. भारत-अमेरिकेमध्ये आता फक्त वस्तूंची आयात-निर्यात होत नाही. अमेरिकेकडून भारत शस्त्रास्त्र सुद्धा खरेदी करतो. आज भारताकडे अमेरिकन बनावटीची P-8I, C-130 ग्लोबमास्टर विमानं, रोमियो, अपाचे, चिनूक सारखी हॅलिकॉप्टर्स आपण खरेदी केली आहेत. लॉकहीड मार्टिन, बोईंग या अमेरिकेतील प्रमुख फायटर विमानं, हेलिकॉप्टर्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांच्याकडून आपण ही शस्त्रास्त्र विकत घेतली आहेत. पण आतापर्यंत भारताने कधीच अमेरिकेकडून F/A-18 सुपर हॉर्नेट, F-16, F-15E स्ट्राइक इगल ही लढाऊ विमानं विकत घेतलेली नाहीत. त्याशिवाय F-22 रॅप्टर, F-35 ही त्यांची स्टेल्थ फायटर जेट्स आहेत. सध्या इराणच्या आकाशात या फायटर विमानांचा मुक्त संचार दिसतो. इराण विरुद्ध युद्धात अमेरिके या...