पती झोड झोड झोडपेल, पण… तालिबानचा ‘क्रूर’ फतवा! अफगाणिस्तानमध्ये काळीज पिळवटणाऱ्या शिक्षा

Afghanistan Taliban Fatwa: अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारच्या नवीन कायद्याने वाद वाढला आहे. जगभरातून तालिबान सरकारवर टीका होत आहे. मानवाधिकार संघटनांनी या सर्व घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.

पती झोड झोड झोडपेल, पण... तालिबानचा क्रूर फतवा! अफगाणिस्तानमध्ये काळीज पिळवटणाऱ्या शिक्षा
अफगाणिस्तान तालिबान नवीन फतवा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 1:19 PM

Afghanistan Taliban Fatwa: तालिबानच्या राजवाटीत महिलांच्या हक्काविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महिलांना अफगाणिस्तानमध्ये नरक यातना सहन कराव्या लागत आहे. तालिबान सरकारने नवीन नियम लागू केले आहे. अफगाणिस्तानमध्ये बाल विवाह विषयी नवीन फतवा काढला आहे. त्यानुसार किशोरवयीन मुलगी लग्नाला विरोध करत नसेल आणि लग्न बोलणीवेळी शांत राहत असेल तर तिची लग्नासाठी सहमती ग्राह्य धरली जाणार आहे. या नवीन नियमामुळे अल्पवयीन मुलींचे लग्न होण्याचा धोका वाढला आहे.

किशोरवयीन मुलीचे मौन म्हणजे लग्नाला होकार

तालिबानच्या नवीन फतव्यानुसार, वयात आलेल्या मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव आला आणि तिने त्याला विरोध केला नाही. ती लग्नाच्या बोलणीवेळी मौन राहिली. तर तिचा लग्नाला होकार आहे असे ग्राह्य धरण्यात येईल. तालिबानच्या या नवीन धोरणाचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. मानवाधिकार संघटनांनी त्याला विरोध केला आहे. जागतिक संघटनांनी तालिबानवर दबाव आणण्याची विनंती करण्यात येत आहे. लग्नासाठी मुलीची सहमती आवश्यक आहे, पण तिच्यावर कुटुंबियांनी दाबाव टाकल्यास ती अशा प्रस्तावामुळे काहीच विरोध करणार नाही आणि तिच्यावर कमी वयातच मातृत्व लादलं जाईल अशी टीका होत आहे.

घटस्फोटासाठी थेट न्यायालयात धाव

नवीन कायद्यानुसार, जर लग्नानंतर घटस्फोट घ्यायचा असेल तर महिलांना तलाक म्हणून सूट मिळवता येणार नाही. तिला यासाठी न्यायपालिकेचा दरवाजा ठोठवावा लागेल. मुलगी अथवा महिला स्वतःहून लग्न मोडू शकत नाही. त्यामुळे जर पतीशी खटकत असेल तर तिला पतीच्या मर्जीनेच राहावे लागणार आहे. हा मोठा अन्याय असल्याचा मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे.

पतीने मार मार मारले तरी…

तालिबानने अजून एक फतवा काढला आहे. पतीने पत्नीला कितीदा जरी मारले तरी तिला तक्रार देता येणार नाही. पतीने तिला बेदम मारले तरी तिला दाद मागता येणार नाही. या मारहाणीत तिचे हाड मोडले तर मात्र तिला पोलिसांकडे अथवा प्रशासनाकडे तक्रार करता येईल. म्हणजे तक्रार करण्यासाठी महिलांनी हाडं मोडण्याची वाट पाहायची का? असा सवाल मानवाधिकार संघटनांनी विचारला आहे. तर अनेक कायदे करून मुलींच्या शिक्षणावर तालिबानने अगोदरच बंधनं आणली आहे.  महिलांचे कपडे, सौंदर्य प्रसाधने आणि पर्यटनावरही अनेक बंधनं आहेत.

Follow Us