चहाचा एक घोट पिताच अपंग झाली महिला, मरता-मरता वाचली, तुमच्यासोबतही घडू शकतं असं, नेमकं कारण काय?

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एक महिला सोफ्यावर बसून चहा पीत होती, मात्र चहाचा एक घोट पिताच तिला अपंगत्व आलं, या बाबत आता डॉक्टरांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

चहाचा एक घोट पिताच अपंग झाली महिला, मरता-मरता वाचली, तुमच्यासोबतही घडू शकतं असं, नेमकं कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 6:23 PM

एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे, चहाचा एक घोट पिताच या महिलेला अचानक अपंगत्व आलं, ही महिला मरता-मरता वाचली आहे. ही घटना स्कॉटलँडमधील आहे. करिना व्हाइट असं या महिलेचं नाव आहे. करिनाने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे, घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानं आनंदाचं वातावरण होतं, मात्र या घटनेनं करिनाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तीस वर्ष वय असलेली ही महिला सोफ्यावर बसून चहा पीत होती, आणि सोबतच आपल्या लहान मुलीला दूध देखील पाजत होती. जेव्हा तीने पहिला चहाचा घोट घेतला आणि तो तिच्या पोटात गेला तेव्हा तिचं अर्ध आंग पॅरालाईज झालं. सुरुवातीला तिला वाटलं की आपल्याला अॅलर्जी असावी, मात्र जेव्हा तिला कळालं की आपल्याला स्ट्रोक आला आहे, तेव्हा तिने तातडीनं रुग्णालयात धाव घेतली.

जेव्हा डॉक्टरांनी या महिलेला तपासलं तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं, या महिलेला कोणताही स्ट्रोक आला नव्हता, किंवा तिला अ‍ॅलर्जी देखील नव्हती. तर तिला एक दुर्मिळ आजार झाला होता, ज्याचं नाव बेल्स पाल्सी असं आहे, डॉक्टरांनी या आजाराबाबत बोलताना सांगितलं की हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये अचानक तुमच्या चेहऱ्याच्या पेशी या कमजोर होऊन लकवाग्रस्त होतात. या महिलेवर पुढील पाच दिवस रुग्णालयातच उपचार करण्यात आले. तिच्यावर औषधोपचार करून सुट्टी देण्यात आली, मात्र त्यानंतर तिला प्रचंड अशा त्रासाचा सामना करावा लागला, तिचं तोंडच उघड नव्हतं, पाणी पिण्यासाठी देखील प्रचंड त्रास होत होता. ती जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तीचा एक डोळा देखील झाकत नव्हता, टेपच्या मदतीनं तिचा डोळा बंद करावा लागायचा. मात्र आता औषधांमुळे या महिलेच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली असून, तिचा त्रास कमी झाला आहे. तिने आपला अनुभव शेअर केला आहे, तसेच काळजी घेण्याचं आव्हानही केलं  आहे.