
Parallel Universe Viral Video : सध्याचं जग हे इंटरनेट आणि सोशल मीडियाचं आहे. जगातल्या कोणत्याही भागातील माहिती तुम्हाला इंटरनेटवर सापडते. विशेष म्हणजे सोशल मीडियामुळे अचंबित करून टाकणाऱ्या गोष्टी तुमच्यासमोर येतात. सध्या असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. अमेरिकेत एक महिला अशा देशातून आली आहे, जो कुठेही अस्तित्त्वात नाही. विशेष म्हणजे तिच्याकडे असणारा पासपोर्ट एकमद खराखुरा असल्याचे सांगितले जात आहे. जगात अस्तित्त्वातच नसलेल्या देशामधून ही महिला आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही महिला दुसऱ्या एखाद्या जगातून तर आलेली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, फॅक्ट चेकच्या माध्यमातून अमरेकित प्रकट झालेली ही महिला आणि तिच्या हतात असलेल्या पासपोर्टबाबत खरीखुरी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिलेजवळ एक पासपोर्ट दिसतो आहे. या पासपोर्टमध्ये तिच्या देशाचे नाव टोरेंजा असे दाखवण्यात आले आहे. या रहस्यमयी देशाचे नाव पाहून विमानतळावरील अधिकारी चकित झाले आहेत. कारण टोरेंजा नावाचा कोणताही देश या जगात अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे पासपोर्टवर असलेली बायोमॅट्रिक चिप आणि होलोग्राम अगदी खरेखुरे असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे ही महिला नेमकी कुठून आली? असा सवाल विचारला जात आहे.
This old woman she came to America airport, according to her passport her country on the passport doesn’t exist ‘ she came from Torenza’ please who knows This country? pic.twitter.com/RcSnDx6Urj
— Nafisat 💐✨ (@Nafisat__121) October 12, 2025
या महिलेचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओमधील महिलेबाबत शोध घेण्यात आला. तसेच इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचे फॅक्ट चेक करण्यात आले. दरम्यान, करण्यात आलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ खरा नसल्याचे समोर आले आहे. एआयच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या समोर आलेल्या व्हिडीओतील महिला अस्तित्त्वातच नाही. तिचा हा एआय व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. त्यामुळे ती महिला कोणत्याही दुसऱ्या जगातून आलेली नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.