ऑनलाईन भीक मागून 35 लाख कमावले

संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये एका महिलेवर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटस्फोटीत पीडित असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.

ऑनलाईन भीक मागून 35 लाख कमावले

दुबई : संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये एका महिलेवर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटस्फोटीत पीडित असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे. मी घटस्फोटीत आहे, माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी मला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महिला लोकांकडून करत होती. असे करत तीने 50 हजार डॉलर (जवळपास 35 लाख रुपये) जमवले आहेत.

महिलेने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आपल्या पोस्टच्या माध्यमातून तिने अनेकांना फसवले आणि 17 दिवसात ही कमाई केली. महिलेने ऑनलाईन अकाऊंट तयार केले आणि आपल्या मुलांचे फोटो त्यावर शेअर केलेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांना सांभाळण्यासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत मागितली, असं दुबई पोलीसांनी सांगितले.

हे प्रकरण जेव्हा पोलिसांनी उघडकीस केले आणि तिच्या पतीला कळाले तेव्हा त्याने न्यायालयाच्या माध्यमातून सूचना दिली आणि सिद्ध केले आहे की मुलं माझ्या सोबत राहत आहेत. यावरुन स्पष्ट झालं की महिला खोटं बोलत लोकांना लुबाडत होती. यामुळे पोलिसांनी महिलेलेा अटक केली आहे.

अनेक मित्र आणि नातेवाईकांचे फोन आल्यानंतर तिच्या पतीला कळाले की, मुलांच्या फोटोच्या माध्यमातून भीक मागितली जात आहे. सोशल मीडियावर आपल्या मुलांना बदनाम करत आणि त्यांचा अपमान करत या महिलेने 17 दिवसांत 50 हजार डॉलरची कमाई केली आहे.

रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर भीकाऱ्यांसोबत सहानुभूती ठेवू नका, असं आव्हान दुबई पोलिसांनी लोकांना केलं आहे. ऑनलाईन भीक मागणे हा गुन्हा आहे आणि दुबई पोलीस या प्रकरणात कारवाई करते. भिकारी ऑनलाईन खोटं बोलून लोकांची भावना दुखावत आहे आणि त्यांची फसवणूक करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *