अमेरिकेपुढील सर्वात मोठा धोका…शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावण्याची तयारी केली. त्यात भारत आणि चीन यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या दाैऱ्यावर चीनचे अध्यक्ष जाणार आहेत.

अमेरिकेपुढील सर्वात मोठा धोका...शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी थेट..
Donald Trump and Xi Jinping
| Updated on: Sep 21, 2026 | 2:42 PM

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव असताना डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आले होते. दोन्ही देशातील संबंध तणावात आहेत. चीन हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने चीनवर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. भारतासह चीनवरही मोठा टॅरिफ लागणार आहे. चीनने या टॅरिफला स्पष्टपणे विरोध केला. आम्ही कोणाकडून काय खरेदी करायचे हे आम्ही ठरवणार इतर देशाचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे चीनने म्हटले. चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग भारत दाैऱ्यावर होते. ब्रिक्स परिषदेसाठी जिनपिंग भारत दाैऱ्यावर होते. त्यावेळीच पुतिन हे देखील भारत दाैऱ्यावर होते. भारत, चीन आणि रशियाला एकत्र पाहून अमेरिकेचा मोठा थयथयाट झाल्याचे बघायला मिळाले.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प कम्युनिस्टोंची विचारधारा कम्युनिज्मला अमेरिकेच्या इतिहासातील मोठा धोका आहे. मुदत निवडणुकांपूर्वीच ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सवर कम्युनिस्ट असल्याचा आरोप केला आणि म्हटले की, जर विरोधी पक्ष सत्तेवर आला तर देश कम्युनिस्ट बनेल.

तरीही याच आठवड्यात ते जगातील सर्वात शक्तिशाली साम्यवादी राष्ट्र असलेल्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्वागत करणार आहेत. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी 2020 च्या निवडणुकांमध्ये चीनने घातक हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. यासोबतच कायमच चीनवर गंभीर आरोप करताना ट्रम्प दिसतात. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने चीनला मदत मागितली होती. इराणविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने चीनच्या युद्धनाैका मागितल्या होत्या. मात्र, चीनने स्पष्ट केले की, आम्हाला या युद्धात पडायचे नाही.

चीनने अमेरिकेला मदतीसाठी स्पष्ट नकार दिला. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या बघायला गेले तर तणावात आहेत. एकीकडे मित्र म्हणून सांगायचे तर दुसरीकडे कुरघोड्या करायच्या ही भूमिका अमेरिकेची बघायला मिळते. भारतावरही मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. भारत आणि चीन यांचे नाव टॅरिफ लावल्याबाबत आघाडीवर आहे. भारतासोबतच अजून 3 देशांवर टॅरिफ लावण्याचा तयारीत अमेरिका आहे. तसा विधेयकही संसदेत पास करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us