AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताविरोधात नडणाऱ्याचा गेम, चीनचा जनरल थेट… शी जिनपिंग यांच्या आदेशाने मोठी उलथापालथ

भारत आणि चीनचे संबंध गेल्या काही वर्षांचा विचार केला असता सुधारताना दिसत आहेत. त्यातच आता चीनच्या राष्ट्रध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला. नेपाळमधील पुराच्य पार्श्वभूमीवर चीनवर गंभीर आरोप केली जात आहेत.

भारताविरोधात नडणाऱ्याचा गेम, चीनचा जनरल थेट... शी जिनपिंग यांच्या आदेशाने मोठी उलथापालथ
India Pakistan US Kashmir
| Updated on: Aug 29, 2026 | 6:40 PM
Share

भारत आणि चीनमध्ये कायमच स्पर्धा राहिली आहे. 2020 मध्ये सीमेवर मोठा तणाव बघायला मिळाला. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांचे संबंध अधिक चांगले होताना दिसले. अमेरिकेचा पुढे येऊन विरोध करताना चीन दिसला. यादरम्यानच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचा दाैरा केला. भारत आणि चीनमध्ये महत्वाचे करार देखील झाले. त्यातच आता चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. थेट आदेश काढले. ज्यानंतर आता भारत आणि चीनचे संबंध अधिक चांगलेच होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये मोठा पूर आला. या पुराला चीनच दोषी असल्याचे सांगितले जाते. चीन नेपाळला वाचू शकला असता असा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यातच आता मोठी बातमी चीनमधून पुढे येताना दिसतंय.

शी जिनपिंग यांच्या सरकारने जनरल झाओ झोंगकी यांना त्यांच्या वरिष्ठ राजकीय सल्लागारपदावरून हटवले आहे. डोकलाममधील तणाव आणि 2020 मध्ये भारतासोबत झालेली गलवान खोऱ्यातील चकमक या घटनांमुळे झाओ झोंगकी चर्चेत होते. भारताविरोधात त्यांनीच आदेश दिले होते. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे नेतृत्व करताना झाओ यांनी भारताबद्दल धक्कादायक निर्णय घेतला. आता त्यांना दणका देण्यात आला.

मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील तणावाच्या काळात तेच जबाबदार होते. गलवानमधील प्राणघातक संघर्षाचे आदेश त्यांनी दिली होती. अमेरिकेच्या 2020 मधील गुप्तचर अहवालाचा संदर्भ देत एएनआयने वृत्त दिले आहे की, भारताला धडा शिकवण्यासाठी झाओ यांनी गलवानमधील कारवाईला मंजुरी दिली होती. ज्यानंतर दोन्ही सैन्यामध्ये मोठी झडप झाली. या झडपमध्ये भारतीय सैन्याच्या तब्बल 20 जवान शहीद झाले होते.

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये दगड, देशी शस्त्रे, लोखंडी सळया घेऊन संघर्ष झाला होता. झाओ यांची चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्समधील सदस्यत्व रद्द करण्यात आली. शी यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेदरम्यान शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी चीनने झांग युक्सिया आणि लिऊ झेनली या दोन वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना सेंट्रल मिलिटरी कमिशनमधून हटवले.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल