AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत, रशिया आणि चीनच्या मैत्रीचे नवे पर्व? अमेरिकेला दणका, जिनपिंग लवकरच भारत भेटीवर

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावात आहेत. पण रशियाच्या मध्यस्थीमुळे हे संबंध पुन्हा एकदा सुधारताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मोठी बातमी पुढे येत आहे. लवकरच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारत दाैऱ्यावर येऊ शकतात.

भारत, रशिया आणि चीनच्या मैत्रीचे नवे पर्व? अमेरिकेला दणका, जिनपिंग लवकरच भारत भेटीवर
Xi Jinping and pm modi
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: May 20, 2026 | 8:58 PM
Share

भारत आणि चीन यांच्यातील संबंध सतत सुधारताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच रशियाचा अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दाैऱ्यावर होते. एकमेकांचे कट्टर दुश्मन असलेले भारत आणि चीन एकाच मंचावर आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. या भेटीकडे जगाच्या नजरा होत्या. आता चीन आणि भारत आणखीन जवळ येऊ शकतात. चीन आणि भारत यांच्यातील संबंधांचा दुसरा अध्याय सुरू झाल्याचे बघायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. भारत आणि चीन यांच्यातील गेल्या अनेक वर्षातील तणाव निवळल्याचे दिसत आहे. सीमेवरही शांतता आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. होय तुम्ही अगदी खरे ऐकले. चीनचे अध्यक्ष लवकरच भारत दाैऱ्यावर येऊ शकतात. तशी चर्चाही सुरू आहे. चीनचे अध्यक्ष भारत दाैऱ्यावर म्हणजे या अमेरिकेसाठी मोठ्या मिरर्च्या म्हणाव्या लागतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत दाैऱ्यावर येऊ शकतात. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर शी जिनपिंग हे भारत दाैऱ्यावर येऊ शकतात. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहू शकतात. या परिषदेकरिता रशियाचे अध्यक्ष पुतिन हे देखील उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुतिन यांच्याकडून चीन आणि भारताला एकत्र आणण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. रशियाकरिता भारत हा जुना आणि महत्वाचा मित्र आहे. कायमच रशिया भारताच्या मागे उभा राहिला आहे. चीन आणि भारत एकत्र येणे म्हणजे मोठी ताकद रशियासाठी निर्माण होणे आहे. म्हणून रशिया दोन्ही देशातील संबंध वाढवण्याकरिता प्रयत्न करत आहे.

रशियन वृत्तसंस्था TASS च्या वृत्तानुसार, रशियन अधिकाऱ्यांनी पुतिन यांच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे. रशिया, भारत आणि चीन दिल्लीत एकत्र एकाच मंचावर आले तर हा जगाकरिता मोठा संदेश असणार आहे. यापूर्वी चीनमध्ये हे तिन्ही देश एकत्र आले होते. पाकिस्तान आणि अमेरिकेकरिता हा दणका म्हणावा लागेल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ