
येमेनचं चित्र फारसं चांगलं नाही. येमेनची गाझासारखी परिस्थिती होण्याची चिंता जगभरातल्या लोकांना लागून आहे. येमेनमध्ये अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान 123 जण ठार झाले आहेत. तर या हल्ल्यांमध्ये 247 जण जखमी झाले आहेत, अनेक महिला आणि लहान मुलेही जखमी झाली आहेत. त्यामुळे येमेनमधील परिस्थिती किती भयावह असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराच्या दैनंदिन हल्ल्यांमध्ये हौथींचा पूर्णपणे नाश केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
अमेरिकेने गेल्या महिन्यात येमेनच्या हौथी बंडखोरांविरोधात बॉम्बहल्ला मोहीम सुरू केली होती, ज्याची सुरुवात इस्रायलने 18 मार्च रोजी गाझामध्ये शस्त्रसंधी तोडल्यापासून झाली होती. इस्रायलने गाझामध्ये हाहाकार माजवला असून नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. येमेनमध्येही अमेरिकेने असेच काहीसे केले आहे.
येमेनची राजधानी सना येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्चच्या मध्यापासून येमेनमध्ये अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात किमान 123 जण ठार झाले आहेत. तर या हल्ल्यांमध्ये 247 जण जखमी झाले आहेत, अनेक महिला आणि लहान मुलेही जखमी झाली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराच्या दैनंदिन हल्ल्यांमध्ये हौथींचा पूर्णपणे नाश केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. इस्रायलवरील हौथी हल्ले रोखणे तसेच लाल समुद्रातील शिपिंग लेन रोखणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे वॉशिंग्टनचे म्हणणे आहे. मात्र, जोपर्यंत इस्रायल पॅलेस्टाईनवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई सुरूच ठेवण्याचे आश्वासन हौथी गटाने दिले आहे.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या हल्ल्यांमुळे हौथी अतिशय कमकुवत झाले आहेत. परंतु येमेनी गटाचे म्हणणे आहे की अमेरिकेचा हल्ला अयशस्वी ठरला आहे, केवळ नागरी अधिकारी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे आणि त्यांची हल्ला करण्याची क्षमता अबाधित आहे.
इस्रायलने 18 मार्चपासून पुन्हा लढाई सुरू केल्यापासून आतापर्यंत सुमारे 1600 लोकांचा मृत्यू झाला असून, गाझामधील मानवतावादी परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मात्र, पुन्हा एकदा शस्त्रसंधी योजनेवर चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायलवरील हौथी हल्ले रोखणे तसेच लाल समुद्रातील शिपिंग लेन रोखणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे वॉशिंग्टनचे म्हणणे आहे. दरम्यान, आता ही परिस्थिती निवळण्याचे कोणतेही संकेत नसून बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.