
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी असलेले बऱ्याच गोष्टींसोबतचे संबंध तोडले आहेत. तसेच भारतातील मुस्लिमांना पुन्हा पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यावेळी हिंदू- मुस्लीम कोण आहे असं विचारून पर्यटकांना मारण्यात आलं. जिथे ऐकीकडे हिंदू-मुस्लीम असा वाद करून निष्पाप लोकांना बळी ठरवलं तर दुसरीकडे असा एक देश आहे जिथे 90 टक्के मुस्लीम राहतात. आणि तेथील प्रत्येक घरात रामायण वाचलं जातं. होय, हे खरं आहे. तेथील प्रत्येक घरात रामायणाचा ग्रंथ हा असतोच असतो.
देशात बहुसंख्य लोक मुस्लिम
हा देश आहे इंडोनेशिया. जेथे बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत. येथील अनेक कुटुंबे रामायण वाचलं जातं. या ग्रंथाचा अभ्यास केला जातो. रामायण हे केवळ हिंदू धर्मासाठी नाही, तर ते एक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे, जी इंडोनेशियात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. काही मुस्लिम कुटुंबांमध्ये रामायण वाचन नियमितपणे केलं जातं.
या देशात प्रत्येक घरात रामायण सापडतं
इंडोनेशियाची लोकसंख्या 23 कोटींच्या आसपास आहे. हा जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला चौथ्या क्रमांकाचा आणि सर्वांत जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. हा मुस्लिम देश असला तरी तिथल्या प्रत्येक घरात रामायण सापडतं आणि प्रत्येक मुस्लिम ते नक्कीच वाचतो.
रामायण आणि या देशाची संस्कृती
रामायण ही एक लोकप्रिय कथा आहे जिचे इंडोनेशियाच्या संस्कृतीत एक महत्त्वाचे स्थान आहे. ही कथा केवळ हिंदू धर्माशी संबंधित नाही, तर ती अनेक संस्कृती आणि समुदायांमध्ये एक प्रभावी कथा म्हणून ओळखली जाते.
मुस्लिम कुटुंबांमध्ये रामायण
इंडोनेशियात, काही मुस्लिम कुटुंबे रामायण वाचन आणि अभ्यास करतात. ते रामायणातील गोष्टी आणि त्यातून मिळणाऱ्या मूल्यांना महत्त्व देतात.
इंडोनेशियात हिंदू धर्म एक अल्पसंख्याक धर्म आहे, परंतु बालीसारख्या काही ठिकाणी हिंदू धर्माचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. बालीमध्ये, रामायणाचे विविध रूपे आणि पद्धती आजही रूढ आहेत.
“धर्म इस्लाम आहे, पण संस्कृती रामायण आहे”
जेव्हा तेथील लोकांना हे विचारलं गेलं की ‘तुम्ही रामायण का वाचता?’, तेंव्हा तेथील लोकांकडून अशी प्रतिक्रिया मिळाली चांगला माणूस होण्यासाठी रामायण वाचलं जातं. एवढंच नाही तर तेथील शाळेत-पाठय पुस्तकात रामचरित्र शिकवलं जातं. धर्माच्या कट्टरतेशी न जोडता जे चांगलं, योग्य वाटत ते स्वीकारणे. ते या धर्मातील आहे, त्या धर्मातील आहे, असा विचार न करता फक्त चांगलं आहे ते स्वीकारणं एवढंच या देशातील लोकं मानतात. तेथील लोकांच्याच म्हणण्यानुसार त्यांचा धर्म इस्लाम असला तरी संस्कृती रामायण आहे.
भारतातल्या आणि या देशातील रामायणात थोडा फरक
इंडोनेशिया आणि भारतातल्या रामायणात थोडा फरक आहे. अयोध्या ही भारतातली रामनगरी आहे, तर इंडोनेशियात ते योग्या नावानं वसलेलं आहे. तिथे रामकथा काकानिन किंवा काकावीन रामायण नावानं ओळखली जाते. भारतीय प्राचीन सांस्कृतिक रामायणाचे रचनाकार प्राचीन कवी वाल्मिकी ऋषी आहेत, तर इंडोनेशियात रामायणाचे रचनाकार कवी योगेश्वर आहेत.